गुरुवारी(१६ सप्टेंबर) भारताचा कर्णधार विराट कोहलीने टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेनंतर टी२० संघाचे नेतृत्वपद सोडणार असल्याचे जाहीर करत, सर्वांना धक्का दिला. त्यामुळे आता मागील अनेक दिवसांपासून भारतीय संघाच्या कर्णधारपदाबाबत होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. विराटनेच स्वत: घोषित केले आहे की टी२० विश्वचषक २०२१ त्याचा टी२० कर्णधार म्हणून अखेरची स्पर्धा असेल.
असे असले तरी विराटने स्पष्ट केले की तो कसोटी आणि वनडे कर्णधार म्हणून तो कायम राहिल. विराटने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत हा निर्णय सर्वांना कळवला आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये टी२० कर्णधार म्हणून त्याच्या प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. तर, त्याने असेही सांगितले की हा निर्णय घेण्यापूर्वी त्याने त्याच्या जवळच्या लोकांशी, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि उपकर्णधार रोहित शर्माशी चर्चा केली आहे.
याबरोबरच विराटने कामाचा ताण अधिक होत असल्याचे कारण देत हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. त्याने म्हटले आहे की ‘गेले ५-६ वर्षे नेतृत्व करत आहे, त्यामुळे मला वाटते की मी स्वत:ला भारताच्या वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी पूर्ण सज्ज होण्यास वेळ द्यायला हवा.’
विराटच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी विराटला त्याच्या टी२० कर्णधार म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद म्हटले आहे. तर काहींनी मजेशीर मीम्स शेअर केले आहेत. तर काहिंनी रोहित शर्मा आता भारताचा टी२० कर्णधार होऊ शकतो, असे म्हटले आहे. तर अनेक चाहत्यांनी भारताचा टी२० विश्वचषक जिंकून टी२० कर्णधार पदाची अखेर गोड व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Hope you finish your T20I captaincy stint on a high with the glory of a T20 Wc win @imVkohli 🖤😭 pic.twitter.com/kDBFENLKZD
— TN VIRAT Army™ (@TNVIRATArmy) September 16, 2021
Respect to Virat Kohli for this decision. Hope Team India will win this T20 World Cup for him and Ravi Shastri.
— R A T N I S H (@LoyalSachinFan) September 16, 2021
We became ur fan when you started as a "Player" for the team, not after you became as a "Captain"
We fans always stand with you ❤️
Best wishes for the upcoming T20 Worldcup #King ❤️ pic.twitter.com/asDfk968wY
— ℳя. வில்லங்கம் ✇ 🪄 (@Vineethian) September 16, 2021
https://twitter.com/HanuNewws/status/1438552522415742986
https://twitter.com/yadavbandhu__/status/1438511080574128128
#ViratKohli step down from T20 #captaincy ..🤦🏻♂️ pic.twitter.com/bo8LtyzqBr
— Syed Dawood (@Thanos_pandith) September 16, 2021
https://twitter.com/CricShift/status/1438538220086575105
https://twitter.com/Hmka_join_krlo/status/1438506037275807747
#ViratKohli champ💔❣️ pic.twitter.com/EsktjPsdTl
— vivek (@kohliviveka) September 16, 2021
https://twitter.com/chann_channnn/status/1438514978617585681
https://twitter.com/thousif_y/status/1438545901190979609
*Rohit to #captaincy – pic.twitter.com/xLuZefd7NI
— 𝓹𝓻𝓲𝓷𝓬𝓮𝓪𝓴𝓼𝓱𝓾𝓷𝓿𝓮𝓻𝓶𝓪 (@Princeakshun07) September 16, 2021
All the best both 🌝❤️#rohitsharma #ViratKohli #captaincy pic.twitter.com/5iNN13Ofsr
— parvez 🙇🏻♂️ (@SachinParvez) September 13, 2021
We’ll miss your aggression and passion for win the T20 match as a captain, King #Kohli @imVkohli https://t.co/Ok3kSI0ttS
— Dr. Henal Patel🇮🇳 (@Dr_HenalPatel) September 16, 2021
#RohitSharma is going to be Indian captain.
Rohitian right now😍😍#BCCI #captaincy #ViratKohli pic.twitter.com/U7VfV8cskY— Adarsh singh🇮🇳 (@AdarshRo45) September 13, 2021
The way you have built and led this team of young guns since you took over as the Captain has been incredible!
You were and are my biggest inspiration Champ🥺💔
Respect your decision 🙂#ViratKohli pic.twitter.com/NvimqYeh1K
— Shiva Akunuri (@AkunuriShivaa) September 16, 2021
https://twitter.com/IAmFarid4/status/1437272825912459267
विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ४५ टी२० सामने खेळले आहेत. त्यातील २७ सामने सामने जिंकले असून १४ सामन्यांत पराभव स्विकारावा लागला आहे. त्याचबरोबर २ सामने बरोबरीत सुटले आहेत, तर २ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
कॅप्टन म्हणूनही ‘किंग’! टी२० क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत विराट जगातील भल्याभल्या कर्णधारांना पडलाय भारी
धोनी नव्हे विराटच भारताचा सर्वोत्तम टी२० कर्णधार! पाहा आकडेवारी
एकच वादा रिषभ दादा! उर्वरित आयपीएलसाठी दिल्लीच्या कर्णधारपदी पंतच राहणार, वाचा सविस्तर