तब्बल ५ बदलांसह सोमवारी (दि. ०९ मे) मैदानात उतरलेला कोलकाता नाईट रायडर्स संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध ५२ धावांनी विजय मिळवला. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर पार पडलेला हा इंडियन प्रीमिअ लीग २०२२मधील ५६वा सामना होता. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने धक्कादायक वक्तव्य करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
खरं तर, मैदानावर संघाने कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत उतरायचे हा निर्णय परिस्थितीनुसार कर्णधार आणि प्रशिक्षक करतात. मात्र, कोलकाता संघ कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत उतरणार यामध्ये संघाचे सीईओ वेंकी म्हैसूर यांचा महत्त्वाचा हस्तक्षेप असतो. याचा खुलासा खुद्द कर्णधार श्रेयस अय्यरने केले आहे.
मुंबईविरुद्ध मोठा पराभव झाल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला की, “प्लेइंग इलेव्हनबाबत मोठी बातचीत झाली होती. या बैठकीत प्रशिक्षकांव्यतिरिक्त संघाचे सीईओदेखील उपस्थित होते. यादरम्यान हा निर्णय घेतला गेला की, कोणता खेळाडू आज मैदानात उतरेल आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे. ज्यांना आजच्या सामन्यात संधी मिळणार होती, त्यांना प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी जाऊन सुचना दिली होती. सर्व खेळाडूदेखील या निर्णयाशी सहमत असल्याचे दिसले.”
अशात आता प्रश्न उपस्थित होत आहे की, संघाची निवड करताना सीईओचे काय काम? असेही नाही की, वेंकी म्हैसूर यांना क्रिकेटचा अनुभव आहे. या सामन्यात जर कोलकाता संघ पराभूत झाला असता, तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? कारण, सामन्यात कोणत्या खेळाडूंना खेळवायचे, हे एक कर्णधार आणि प्रशिक्षकांना चांगलेच ठाऊक असते. दुसरीकडे, जर संघाची निवड करताना सीईओ हस्तक्षेप करत असतील, तर संघाच्या प्रदर्शनावरही याचा परिणाम होऊ शकतो.
TBH good on Shreyas Iyer to say that coach and CEO have more power than him in team selections.
Why should he take the backlash for the sorry squad KKR assembled?
BTW,all those who thought that Shreyas was evil genius captain after first few matches can maybe pipe down now.
— Akash (@Akashkumarjha14) May 9, 2022
Shreyas Iyer on KKR team selection:
"It is really difficult (to tell players about axings). Coach and at times, CEO is also obviously involved in team selections. Each and every player takes it well, and they have put in their best efforts."#IPL2022
— Subhayan Chakraborty (@CricSubhayan) May 9, 2022
Shreyas Iyer is saying CEO is involved in team selection 😳😳😳
Never expected this tbh#KKRvMI
— Bumrah is God (@EternalBlizard_) May 9, 2022
Shreyas getting sacked after one season after that comment (CEO involved in team selection)? Surely, it will ruffle a few feathers #IPL2022 #MIvKKR
— Anshul Gupta (@oyegupta_) May 9, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कोलकाता संघाची हंगामातील कामगिरी
कोलकाता संघाने या हंगामात आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी फक्त ५ सामने जिंकले आहेत, तर उर्वरित ७ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. या सामन्यापूर्वी नवव्या क्रमांकावर असलेला कोलकाता संघ आता मुंबईविरुद्धच्या विजयानंतर १० गुणांसह सातव्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हे काय? पोलार्डने लाईव्ह सामन्यात पंचांना मारला बॉल आणि लागला हसू, कर्णधार रोहितनेही दिली साथ
केकेआरचा कर्णधार आणि कोचमध्ये नाही सर्वकाही अलबेल, माजी क्रिकेटरच्या प्रतिक्रियेने खळबळ
मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे खलनायक ठरले ‘हे’ ३ क्रिकेटर्स, रोहितच्या भरवशाच्या खेळाडूचाही समावेश