---Advertisement---

‘ये दुख काहे खत्म नही होता’, धोनी टीम इंडियाचा मेंटॉर होताच गौतम गंभीर आला चाहत्यांच्या निशाण्यावर

On: गुरूवार, सप्टेंबर 9, 2021 2:11 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी (८ सप्टेंबर) टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी भारतीय संघ घोषित केला. याबरोबरच या विश्वचषकासाठी माजी कर्णधार एमएस धोनीही भारतीय संघाबरोबर मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून जोडला जाईल असेही जाहीर केले. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर सध्या ट्रोल होत आहे.

गंभीर होतोय ट्रोल
धोनी भारतीय संघाचा मेंटॉर होताच गौतम गंभीर अचानक सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. त्यामागचे कारण असे की मागील काही दिवसात गंभीरने अनेकदा धोनीवर निशाणा साधला होता. तो सातत्याने धोनीविषयी नकारात्मक वक्तव्ये करताना दिसत असतो. त्या कारणाने अनेक वेळा क्रिकेटप्रेमी त्याला निशाण्यावर ठेवतात.

त्याने २ महिन्यांपूर्वी ७ जुलै रोजी धोनीच्या ४० व्या वाढदिवसाला आपल्या फेसबुक हेडरवर २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील एक छायाचित्र पोस्ट केले होते. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत गंभीरने ९७ धावांची खेळी केली होती. त्याचवेळी धोनीने ९१ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात सामनावीर म्हणून धोनीची निवड करण्यात आली. त्यामुळे अनेकदा गंभीरचे यश धोनीमुळे झाकोळले गेल्याचा आरोप केला जातो. पण, गंभीरने धोनीच्या वाढदिवशी फेसबुक हेडर बदलल्याने तो चाहत्यांच्या निशाण्यावर आला होता.

त्याचमुळे आता धोनी भारतीय संघासह टी२० विश्वचषकादरम्यान ड्रेसिंग रुममध्ये पुन्हा दिसणार असल्याने अनेक क्रिकेटप्रेमींनी गंभीरला ट्रोल केले आहे. काही मजेदार मीम्सही यावेळी व्हायरल होत आहेत. एका युजरने एक मीम शेअर केले आहे ज्यावर लिहिले आहे की ‘ये दुख काहे खत्म नही होता हैं बे’. तसेच दुसऱ्या एका युजरने ‘ऐसा क्या है उसमे जो मुझमे नही’, असे वाक्य लिहिलेले मीम शेअर केले आहे. या व्यतिरिक्तही अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

https://twitter.com/prakashRam89/status/1435658779761131523

https://twitter.com/ItsRoshanRai/status/1435640015489417218

https://twitter.com/StalwartMSD/status/1435656947076763656

https://twitter.com/Aak__Thu/status/1435660786752376839

https://twitter.com/maannniiiiiii/status/1435636932327862275

https://twitter.com/DINU2551993/status/1435663410293739520

धोनी नव्या भूमिकेत
टी२० विश्वचषकाचे हे सातवे पर्व आहे. यापूर्वी झालेल्या सर्व ६ टी२० विश्वचषकात एमएस धोनी खेळला होता. विशेष म्हणजे तो सर्व ६ टी२० विश्वचषकादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार होता. मात्र, यंदा तो टी२० विश्वचषकात मेंटॉरच्या भूमिकेत दिसेल.

धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार समजला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ सालचा टी२० विश्वचषक, २०११ चा वनडे विश्वचषक आणि २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. त्याने गेल्यावर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तो २०१९ विश्वचषकात अखेरचा भारतीय संघाकडून खेळला होता. पण आता जवळपास २ वर्षांनंतर पुन्हा एकदा धोनी भारतीय संघासह दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘वाथी कमिंग’! धोनी टीम इंडियाचा मेंटॉर होताच सोशल मीडियावर पडतोय प्रतिक्रियांचा पाऊस

उन्मुक्त चंदने गाजवली अमेरिका! १० षटकार आणि ३० चौकारांच्या मदतीने ठोकल्या ३०४ धावा

सुरेश रैनाने धोनीच्या मैदानातील आवडत्या डायलॉग विषयी केला खुलासा, म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---