आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायर म्हणून काम केले जॉन होल्डर आणि इस्माईल दाऊद यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डवर वर्णभेदाचा आरोप लावला आहे. या दोन्ही अंपायरांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डवर त्यांच्या कार्यकाळात वर्णभेदाचा गंभीर आरोप लावत न्यायालयात दाद मागितली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड मध्ये अल्पसंख्यांक समाजाचे कमी अधिकारी असून तपास योग्यरीतीने करावा अशी मागणी देखील दोघांनी केली आहे.
द गार्डियन या वृत्तपत्राच्या माहितीनुसार , होल्डर यांनी ख्रिसमसच्या दोन दिवस आगोदर न्यायालयात दाद मागितली आहे.. होल्डर मागील तीन दशकांपासून अंपायर म्हणून करत आहेत. त्यांनी 11 कसोटी व 19 वनडे सामन्यात अंपायर म्हणून काम केले आहे. होल्डर व दाऊद यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे आर्थिक भरपाईची मागणी केली आहे.
रिपोर्टनुसार, होल्डर यांना 1991 मध्ये कसोटी सामन्यांमधून बाहेर काढण्यात आले. या तारखेच्या सात दिवसांपूर्वीच होल्डर यांनी वेस्टइंडीज व इंग्लंड मधील झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंड खेळाडूंवर चेंडूची छेडछाड करण्याचा आरोप केला होता .
होल्डर यांनी स्पष्ट केले की , “मला बाहेर काढल्या नंतर सांगण्यात आले की, एका वर्षातच तुम्हाला पुन्हा पॅनल मध्ये घेतले जाईल. पण असे झाले नाही. तब्बल सहा वेळा माझ्यापेक्षा ज्युनियर व्यक्तीला प्रमोशन देण्यात आले ,पण मला अजूनही समजले नाही की मला का डावलण्यात आले.”
महत्त्वाच्या बातम्या-
स्टीव स्मिथ साठी आनंदाची बातमी, तब्बल ४ महिन्यानंतर भेटणार आपल्या पत्नीला
“एनसीएची इच्छा होती की रोहितने त्याचे वजन थोडे कमी करावे”, पाहा कोणी केलंय हे भाष्य
टीम इंडिया सावधान! ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ खेळाडू करतोय पुनरागमन