अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यांसाठी अवघे काही तास बाकी आहेत. तर भारताला सहाव्यांदा, तर ऑस्ट्रेलियाला तिसऱ्यांदा अंडर 19 वर्ल्डकप विजेतेपदाची संधी देखील आहे. यामुळे या सामन्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिले आहे. कारण, वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत झाली होती. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यामुळे कोट्यवधी भारतीय क्रीडाप्रेमींचं स्वप्न भंगलं होतं. त्यामुळे त्या पराभवाची कसर अंडर 19 वर्ल्डकप काढण्याची संधी असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. चला मग जाणून घेऊयात संभाव्य प्लेइंग इलेव्हन आणि पिच रिपोर्टबाबत सर्वकाही.
अंतिम सामन्यांआधी भारतीय कर्णधार उदय सहारन याने पीटीआयशी बोलताना आपलं मत व्यक्त केलं आहे. “नाही असं काही . सूड वगैरे घेण्याचा आमचा विचार नाही. आम्ही वर्तमानावर लक्ष केंद्रीत करत आहोत. भुतकाळात रमण्यात काही अर्थ नाही. आता पुढचं लक्ष्य गाठायचं आहे.” असं उदय सहारन याने म्हंटले आहे.
आत्तापर्यंत अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया आणि भारत तीन वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी दोन सामन्यात भारताने, तर एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. तर भारतीय संघाने कर्णधार उदय सहारन याच्या नेतृत्वात टीम इंडियाने साखळी फेरीत सलग 3 सामने , सुपर सिक्स फेरीत सलग दोन सामने जिंकले. त्यानंतर उपांत्य फेरीत यजमान दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला. आता अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी लढत असणार आहे.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघात तीन बदल केले होते. त्यामुळे अंतिम फेरीसाठी संघात निश्चित बदल करण्याची दाट शक्यता आहे. तसेच, अंतिम सामन्यांसाठी टीम इंडियात बदल करण्याची शक्यता फारच कमी आहे. तर उपांत्य फेरीपर्यंत खेळलेला संघच अंतिम फेरीत खेळताना पहायला मिळणार आहे.
घ्या जाणून पिच रिपोर्ट
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यांसाठी दक्षिण अफ्रिकेतील विलोमूरे पार्क मैदानात वेगवान गोलंदाजांना मदत करणार आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. रविवारी झालेल्या सामन्यातही कमी स्कोअर पाहायला मिळाला होता. या मैदानात आतापर्यंत 27 एकदिवसीय सामने झाले आहेत. त्यात पहिल्यांदा गोलंदाजी घेणारा संघ 17, तर 8 सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे.
दरम्यान, हवामानाच्या अंदाजानुसार, या ठिकाणी पाऊस पडण्याची 40 टक्के शक्यता आहे. त्यामुळे सामन्यात काही ठरावीक कालावधी पावसाचा व्यत्यय येईल. कमाल तापमान 23 आणि किमान तापमान 15 डिग्री असेल. तसेच हवामानातील आर्द्रता ही 69 टक्के असणार आहे.
दोन्हीं सघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन पुढीलप्रमाणे :-
भारत अंडर 19 :- आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.
ऑस्ट्रेलिया अंडर 19 :- हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), टॉम कॅम्पबेल, ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन आणि कॅलम विडलर.
महत्वाच्या बातम्या –
नेतृत्वाबाबत स्वतः एमएस धोनीकडून मिळाले मार्गदर्शन, रोहितसह सर्वच कर्णधारांच्या फायद्याची माहिती
‘या’ खेळाडूंकडून अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या विशेष अपेक्षा? वाचा सविस्तर…