U19 World Cup Final : भारताचा 19 वर्षांखालील संघ रविवारी आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळला. अंतिम सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचे आव्हान होते. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 79 धावांनी मात करत चौथ्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये टीम इंडियाला विजयासाठी 254 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाचं 43.5 ओव्हरमध्ये 174 धावांवर पॅकअप झालं. तर ऑस्ट्रेलियाने याविजयासह 2010 नंतर पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. तर टीम इंडिया वर्ल्ड कप विजयाचा षटकार मारण्यात अपयशी ठरली आहे.
अंतिम सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अपयशी ठरला असून भारताचा युवा संघ निर्धारित 50 षटकंदेखील खेळू शकला नाही. त्यामुळे टीम इंडियाला 43.5 षटकांत अवघ्या 174 धावांपर्यंत मजल मारता आली. यामध्ये सलामीवीर आदर्श सिंह (47) आणि खालच्या फळीत मुरुगन अभिषेक (42) या दोघांनी काही काळ प्रतिकार केला खरा, परंतु, या दोघांना दुसऱ्या कुठल्याच फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
याबरोबरच, अंतिम सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणात कामगिरी ही अत्यंत खराब राहिली होती. याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तसेच या अंतिम सामन्यात मुशीर खान, सचिन धस आणि कर्णधार उदय सहारन यांच्याकडूनही चांगली कामगिरी अपेक्षित होती. पण तिघेही अंतिम सामन्यात अपयशी ठरले होते.
अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये मुशीर आणि उदय हे दोघे सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत टॉप-2 मध्ये राहिले. तर उदयने 56.71 च्या सरासरीने 397 धावा केल्या. तसेच, मुशीरने 60 च्या सरासरीने 360 धावा केल्या. तर सचिन धसनेही 303 धावा केल्या आहेत.
दरम्यान, अंतिम सामन्यात चार फिरकी गोलंदाजांनी मिळून 141 धावा दिल्या. तसेच, भारतीय संघ अंतिम फेरीचे दडपण सहन करू शकला नाही. याबरोबरच, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
महत्वाच्या बातम्या –
- Ishan Kishan : इशान किशनचे करिअर धोक्यात…? BCCI कडून मोठ्या कारवाईची शक्यता
- ‘सामना जाऊ दे, शिकून घे…’, अंडर 19 वर्ल्डकपच्या फायनलवेळी भारतीय खेळाडूंमध्ये चर्चा, पाहा VIDEO