पुणे, 3सप्टेंबर 2022: पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत क्वालिफायर 2लढतीत तेलगु योद्धाज संघाने चतुरस्त्र कामगिरी बजवताना गुजरात जायंट्स संघाचा 67-44 असा 23गुणांच्या फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. उद्या, रविवारी (4सप्टेंबर रोजी) सायंकाळी 7 वाजता ओडिशा जगरनट्स संघ व तेलगु योद्धाज संघाशी विजेतेपदासाठी झुंजणार आहे.
शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत आजच्या क्वालिफायर 2 लढतीत प्रतीक वाईकरच्या नेतृत्वाखाली तेलगु योद्धाज संघासमोर आता सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखण्याचे आवाहन आहे. ओडिशा जगरनाट्स संघाने क्वालिफायर 1 लढतीत तेलगु योद्धाज वर मात करून अंतिम फेरी गाठली होती.
याआधी या मौसमात आक्रमणात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तेलगु योद्धाज संघाने सर्वांगीण कामगिरी बजावताना गुजरात जायंट्स संघावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. मध्य तरला 21-39 अशा पिछाडीवर असलेल्या गुजरातने तिसऱ्या सत्रात कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. अभिनंदन पाटीलने 4मिनिटे26 सेकंद सरंक्षण करताना गुजरातला तब्बल 8 बोनस गुण मिळवून दिले. त्यामुळे तेलगु योद्धाज संघ या सत्रात केवळ 22गुण मिळवू शकला.
मात्र अभिनंदन पाटीलच्या अप्रतिम कामगिरी नंतरही तेलगु योद्धाजने तिसऱ्या सत्राअखेर 61-29अशी निर्णयाक आघाडी घेताना सामन्याचा निकाल निष्कर्ष केला.तेलगु योद्धाजने अखेरच्या सत्रात केवळ 15गुण गमावून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इतकेच नव्हे तर अल्टिमेट खो खो लीगच्या पहिल्या मौसमात सरंक्षण करताना 100गुण मिळवणारा तेलगु योद्धाज हा पहिला संघ ठरला. तत्पूर्वी तेलगु योद्धाज संघाने अत्यंत वेगवान आक्रमणाने प्रारंभ करताना पहिल्या सत्रात गुजरात च्या 13 संरक्षकांना टिपून 47 गुणांची नोंद केली. अरुण गुंकीने पाच खेळाडू बाद करताना 14गुण मिळवले.
दुसऱ्या सत्रात गुजरात जायंट्स संघाने पावर प्लेचा अवलंब करून दोन वझीर मैदानात उतरवले. मात्र दीपक माधव याने 2मिनिटे 46सेकंद संरक्षण करताना तेलगु योद्धाजला 2 बोनस गुण मिळवून देत गुजरातला रोखले. गुजरातने 21 गुणांची नोंद करूनही तेलगु योद्धाजल पहिल्या डावा अखेर 39-21 अशी आघाडी घेता आली.
स्पर्धेतील विजेत्या संघाला 1कोटी रुपये पारितोषिक देण्यात येणार असून उपविजेत्या संघाला 50लाख रुपये देण्यात येणार आहेत. तिसऱ्या स्थानावरील गुजरात जायंट्स संघाला 30लाख व चौथ्या क्रमांकावरील चेन्नई क्विक गन्स संघाला 20लाख रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.