इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल २०२२) आठवा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स (KKRvPBKS) या संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात केकेआरने ६ गडी राखून विजय मिळवला. पहिल्या सामन्यापासून फॉर्ममध्ये असलेल्य केकेआरचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) याने या सामन्यात पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी केली. त्याने चार बळी मिळवत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.
उमेशने मोडले पंजाबचे कंबरडे
प्रथम गोलंदाजीची संधी मिळाल्यानंतर कोलकाता संघाकडून पहिले षटक टाकण्यासाठी उमेश यादव आला. त्याने पहिल्याच ओवरच्या अखेरच्या चेंडूवर पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल याला तंबूचा रस्ता उमेशने सलग तिसऱ्या सामन्यातील पहिल्या षटकात बळी मिळवला आहे. त्यानंतर नवव्या षटकात त्याने मोठ्या खेळीच्या दिशेने आगेकूच करत असलेल्या लियाम लिव्हिंगस्टोन याला तंबूचा रस्ता दाखवला. पंधराव्या षटकात पुन्हा एकदा गोलंदाजीला आल्यावर हरप्रीत ब्रार व राहुल चहर यांना दोन चेंडूचा अंतराने बाद केले. ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली.
एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक बळी घेण्याची कामगिरी
उमेश यादव याने या सामन्यात चार बळी घेताना एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक बळी घेण्याची कामगिरी केली. त्याने आतापर्यंत पंजाब विरुद्ध ३३ बळी घेतले आहेत. तर राजस्थान रॉयल्स विरुद्ध अमित मिश्रा याने ३० बळी मिळवले होते. दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने आरसीबी विरुद्ध व भुवनेश्वर कुमार याने केकेआर विरूद्ध प्रत्येकी २७ बळी मिळवले होते.
केकेआरचा मोठा विजय
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर याने घेतला होता. उमेश यादव व टीम साऊदी यांच्या गोलंदाजीच्या जोरावर पंजाबचा डाव १३७ धावांवर गुंडाळला. त्यानंतर आंद्रे रसेलच्या ७० धावांच्या जोरावर कोलकाताने हे आव्हान १४ षटकात पूर्ण केले.
महत्वाच्या बातम्या-
चार हजारी मनसबदार! ‘कूल’ रहाणेच्या आयपीएलमध्ये ४००० धावा पूर्ण (mahasports.in)
IPL 2022: केकेआरच्या चाहत्यांसाठी खुशखबरी, ‘या’ धडाकेबाज खेळाडूची संघात एन्ट्री (mahasports.in)
उमेश एक्सप्रेस सुसाट! पंजाबची वाताहत करत केली अव्वल दर्जाची कामगिरी (mahasports.in)