भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील इंदोर कसोटी सामन्यात खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल पाहायला मिळाली. पण भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादव याने देखील सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्वतःच्या गोलंदाजीने विरोधी संघाचा घाम काढला. काही दिवसांपूर्वी वडिलांचे निधन झाले असताना यादव इंदोर कसोटीसाठी संघासोबत जोडला गेला. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली आणि त्याने या संधीचे सोने देखील केले.
ऑस्ट्रेलियन संघाने इंदोर कसोटीत चांगली सुरुवात केली होती. पण भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा पाहुण्या संघाच्या विकेट्स झटपट घेतल्या. उभय संघांतील बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेचा हा तिसरा सामना असून ऑस्ट्रेलियाने 88 धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या 109 धावांवर गुंडाळला गेल्यानंतर ऑस्ट्रेलिया मोठी आघाडी मिळण्याची शक्यता होती. पण उमेश यादव (Umesh Yadav ), रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) या त्रिकूटाने ऑस्ट्रेलियाला 197 धावांवर रोखले. यादव आणि अश्विनने प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या, तर जडेजाने सर्वाधिक चार विकेट्स नावावर केल्या.
https://www.instagram.com/p/CpDc6E6Pjch/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, दिल्ली कसोटी सामन्यानंतर वेगवान गोलंदाज उमेश यादव याचे वडील तिलक यादव (Tilak Yadav) यांचे 23 फेब्रुवारी रोजी निधन झाले होते. वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर उमेय यादव 1 मार्च रोजी सुरू झालेल्या इंदोर कसोटीसाठी पुन्हा संघासोबत जोडला गेला. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये बेंचवर बसलेला यादव तिसऱ्या कसोटीत मात्र प्लेइंग इलेव्हनचा भाग बनला. सामन्याच्या पहिल्या डावात त्याने एकूण 5 षटके गोलंदाजी केली आणि यात 12 धावा खर्च करून तीन बळी घेतले. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमरून ग्रीन यादवच्या चेंडूल पायचीत झाला, तर वेगवान गोलंदाज मिचेल स्टार आणि फिरकीपटू टॉड मर्फी यांना यादवने त्रिफळाचीत केले. फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर यादवची ही कामगिरी कौतुकास पात्र ठरते.
What a ripper from Umesh Yadav. pic.twitter.com/MckFu7VgpZ
— Johns. (@CricCrazyJohns) March 2, 2023
दुसऱ्या दिवसाची सुरुवात ऑस्ट्रेलियाने संघाने 4 बाद 156 धावांपासून पुढे केली. संघाची धावसंख्या 186 असताना ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्स गमावल्या होत्या. शेवटच्या 11 धावा करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्स गमावल्या. तत्पूर्वी भारतीय संघ फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा युवा फिरकीपटून मॅथ्यू कुह्नेमन याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या होत्या. (Umesh Yadav took three wickets in the first innings of the third Test against Australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“असे काही होण्याची अपेक्षाच नव्हती”, भारतीय फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीवर प्रशिक्षकांची तीव्र नाराजी
बीसीसीआयचा स्वागतार्ह निर्णय! WPL मध्ये मुली-महिलांना मोफत प्रवेश, पुरूषांसाठी तिकिटाचे नाममात्र दर