भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भारतीय चाहत्यांची खूपच निराशा झाली आहे. पहिल्याच सामन्यात यजमान संघाला ७ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. या सामन्यात ‘भारतीय स्पी़डगन’ उमरान मलिक पदार्पण करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष होते. मात्र, युवा खेळाडू उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग बाकावरच बसून राहिले. कर्णधार रिषभ पंतने उमरान आजच्या सामन्यात खेळणार नाही असे घोषित केल्यावर चाहते हैरान झाले.
या सामन्याआधी झालेल्या सरावावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी उमरानच्या गोलंदाजीचे खूप कौतुक केले होते. त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळेल अशा चर्चा सुरू होत्या. पण अंतिम अकरामध्ये त्याचे नाव न आल्याने त्याच्या चाहत्यांनी ट्वीट्स करत आपला राग व्यक्त केला आहे.
https://twitter.com/SagarSurampudi/status/1534895016652378112?s=20&t=FhXIDm8-kAzVwMLA12OJAw
उमरानने आयपीएलमध्ये (इंडियन प्रीमियर लीग) सनरायजर्स हैद्राबादकडून खेळताना १४ सामन्यात २२ विकेट्स घेतल्या होत्या. या २०२२च्या हंगामात त्याने ताशी १५७ किमी वेगाने गोलंदाजी केल्याने तो चर्चेत आला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम अकरामध्ये हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि आवेश खान खेळले.
With no #UmranMalik, I seriously lost the interest to watch the game and I think I'm not the only one. This indian team looks like another IPL team.
Indian mein potential candidates ko chances itna late kyu milte hai? #INDvSA #INDvsSA
— ????Rakshitha (@MarinaSyren) June 9, 2022
https://twitter.com/umran_malik_14/status/1535149352540250112?s=20&t=HU2SyFaydPyj7NDlBtcnig
“काही बाबींना वेळ देऊन त्यांंचे निरीक्षण करणे महत्वाचे असते. तसेच संघात युवा खेळाडू असणे ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे संघात अनेक पर्याय पाहायला मिळतात किंवा त्यांना संधी देऊन ते संघासाठी किती तयार आहे हे कळते,” असे द्रविड यांनी या सामन्याआधीच स्पष्ट केले होते.
या सामन्यात दोन्ही संघाच्या फिरकापटूंनी चांगलाच मार खाल्ला. तर फलंदाजांची तुफानी खेळी पाहायला मिळाली. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. भारतीय फलंदाजांनी हे आव्हान स्वीकारत २० षटकांत २११ धावांचा डोंगर रचला. यामध्ये सलामीवीर इशान किशनने ४८ चेंडूत ७६ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या फलंदाजांची अडखळत सुरूवात झाली. डेविड मिलर-रस्सी वॅन डर दुसेन या जोडीने चौथ्या विकेटसाठी नाबाद १३१ धावांची स्फोटक भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. मिलरने २००पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने नाबाद ६४ आणि रस्सीने नाबाद ४६ चेंडूत ७५ धावा केल्या.
या मालिकेत भारतीय संघ रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) दुसरा टी२० सामना बाराबाती स्टेडियम, कटक येथे १२ जूनला खेळला जाणार आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या राउंडमध्ये अनसोल्ड राहिलेला डेविड मिलर सगळ्यांनाच पुरून उरला
यजमान संघावर विजय मिळवताच खूष झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने केले मोठे विधान
चेंडू आहे की बंदुकीची गोळी? आवेश खानचा खतरनाक यॉर्कर, डुसेनच्या बॅटचे केले दोन तुकडे