भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनी येथे दाखल झाला आहे. या दौऱ्यात ३ वनडे, ३ आंतरराष्ट्रीय टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. अशामध्ये या दौऱ्याबाबत ऑस्ट्रेलियाच्या सीन ऍबॉट या वेगवान गोलंदाजाने मोठे वक्तव्य केले आहे.
ऍबॉटचे असे म्हणणे आहे की, तो भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी तयार आहे. गोलंदाजीसोबतच खालच्या फळीत फलंदाजी करण्याची क्षमताही त्याच्यात आहे. त्याचे म्हणणे आहे की, राष्ट्रीय संघात स्थान मिळवल्यानंतर त्याचे अश्रू थांबत नव्हते.
शेफील्ड शिल्डमध्ये न्यू साऊथ वेल्स संघाकडून खेळणारा ऍबॉट फलंदाजीतही चांगले योगदान देऊ शकतो. त्याने आपल्या मागील प्रथम श्रेणी सामन्यात १ शतक ठोकले होते. सोबतच ४ विकेट्सही घेतल्या होत्या.
कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार
माध्यमांशी बोलताना रविवारी (१५ नोव्हेंबर) ऍबॉट म्हणाला, “एका मिनिटासाठी मला माझ्या अश्रूंना रोखावे लागले होते. मी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी तयार आहे. मी ही संधी दोन्ही हातांनी झेलेल.”
“मी स्वत:ला एका वेगवान गोलंदाजाव्यतिरिक्त फलंदाजीतही पाहू शकतो. परंतु जर मला वरच्या फळीत फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि निवडकर्त्यांनी तसेच कर्णधार टिम पेनने असा विचार केला की मी हे करू शकतो, तर मी याबाबत पुन्हा विचार करणार नाही. जे काही काम माझ्यासमोर असेल, ते मी करेल,” असेही तो पुढे बोलताना म्हणाला.
असे असले तरी त्याला वाटते की, त्याच्यासाठी अंतिम अकरामध्ये स्थान मिळवणे कठीण असेल.
कारकीर्द
ऍबॉटने आतापर्यंत केवळ १ वनडे सामना आणि ४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने वनडेत १ विकेट घेतली आहे, तर टी२०त त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत.
याव्यतिरिक्त त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ५७ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३२.७१ च्या सरासरीने १५७ विकेट्स घेतल्या आहेत. सोबतच फलंदाजी करताना त्याने २१.१५ च्या सरासरीने १५४४ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १ शतक आणि ७ अर्धशतकेही ठोकली आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद १०२ इतकी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘असे’ ठरणार कसोटी चॅम्पियनशीपमधील अव्वल दोन संघ; भारतासाठी वाट कठीण
“विराट जागतिक क्रिकेटमधील सामर्थ्यवान खेळाडू”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य
“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिर्ची…”, युवराज सिंगकडून सानिया मिर्झाला अनोखी उपाधी
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ‘तो’ भारताचा महान गोलंदाज बनेल, ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख-
‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर