भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात राजकोटमधील निरंजन शाह क्रिकेट स्टेडियममध्ये तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. तर टीम इंडिया या सामन्यात मजबुत परिस्थितीत पोहचली आहे. तसेच संघाकडून इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात कुलदीप यादव आणि शुबमन गिल या जोडीने केली होती. याबरोबरच भारतीय संघाकडे तिसऱ्या दिवसअखेर 322 धावांची आघाडी होती.
यानंतर भारतीय संघाने चौथ्या दिवसाची सुरवात ही चांगल्या पद्धतीने केली होती. तसेच कुलदीप-शुबमन जोडीने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी देखील केली होती. यामुळे शुबमन गिल हा शतकाच्या उंबरठ्यावर पोहचला होता. मात्र दुर्देवाने शुबमन गिल नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला आहे. तसेच शुबमन गिलचं शतक दुसऱ्यांदा 9 धावांनी हुकलं आहे.
याबरोबरच गिल कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच रन आऊट झाला आहे. तसेच हा संपूर्ण प्रकार टॉम हार्टलीच्या 64 व्या ओव्हरमध्ये घडला आहे. हार्टलीच्या या ओव्हरमधील सहाव्या बॉलवर कुलदीपने फटका मारुन सिंगलसाठी धावला. मात्र बॉल बेन स्टोक्स याच्याकडे जाताना पाहून तो थांबला. तर कुलदीपच्या कॉलवर शुबमन धावत सुटला. मात्र कुलदीप धावून थांबल्यानंतर शुबमनला मागे जावं लागलं होतं.
तोपर्यंत बेन स्टोक्स याने नॉन स्ट्राईक एंडवर टॉम हार्टलीच्या दिशेने अचूक थ्रो केला. शुबमन गिलने उडी मारुन क्रीझमध्ये पोहचण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टोक्सच्या अचूक थ्रोमुळे शुबमन रन आऊट झाला. शुबमनचं शतक हुकल्यामुळे तो चांगलाच तापला होता. याबरोबरच शुबमन पहिल्यांदाच रन आऊट झाला.तसेच 2021 नंतर तो आता पुन्हा 91 धावांवर आऊट झाला. शुबमन याआधी बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावातही 91 धावांवर आऊट झाला होता.
Number 91 hurts. 💔
A bonus wicket for the visitors as Shubman Gill has to depart. #INDvENG #JioCinemaSports #BazBowled #IDFCFirstBankTestSeries pic.twitter.com/ZLBac2Cwym
— JioCinema (@JioCinema) February 18, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या –
- मुंबई इंडियन्स झाली ILT 20 लीगची चॅम्पियन, अन् मुंबईच्या ताफ्यात दाखल झाली 10वी ट्रॉफी
- राजकोट टेस्टमधून घरी परतलेला अश्विन विमानाने परत राजकोटला? राहिलेली मॅच खेळणार का?