इंडियन प्रीमिअर लीग 2023चा महासंग्राम सुरू झाला आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी काही दिग्गज खेळाडूंनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवणाऱ्या 4 संघांची नावे घेतली होती. या खेळाडूंमध्ये ख्रिस गेल याच्या नावाचाही समावेश होता. गेलचे वक्तव्य आता सर्वत्र चर्चेत आहे. खरं तर, या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा खेळाडू, मार्गदर्शक आणि वेस्ट इंडिज संघाचा माजी विस्फोटक फलंदाज गेलच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, गेलने या संघांमध्ये त्याच्या आरसीबी संघाचा समावेश केला नाहीये.
गेलने निवडले आयपीएल 2023च्या प्लेऑफमध्ये एन्ट्री करू शकणारे 4 संघ
ख्रिस गेल (Chris Gayle) हा आयपीएल स्पर्धेत अनेक संघांकडून खेळला आहे. त्यात कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स या संघांचा समावेश आहे. गेलने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकणाऱ्या 4 संघांविषयी भविष्यवाणी (Chris Gayle Prediction) केली आहे. गेलने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), मागील वर्षी अंतिम सामना खेळणारा राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals), सन 2022चा विजेता गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघांची नावे घेतली.
https://twitter.com/BooksAndCricket/status/1641825409678581765
गेलने चार वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) या संघांना प्लेऑफमधून बाहेर केले. गेलने निवडलेल्या संघांपैकी 3 संघ मागील हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचले होते. मागील वर्षी गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात यश आले होते.
ख्रिस गेलची आयपीएल कारकीर्द
ख्रिस गेल याने त्याच्या कारकीर्दीची सुरुवात कोलकाता संघासोबत केली होती. या फ्रँचायझीसोबत तो तीन वर्षे खेळला. मात्र, त्यानंतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची साथ धरली. त्याचा शेवटचा आयपीएल संघ पंजाब किंग्स होता. त्याने 142 आयपीएल सामन्यांमध्ये 148.96च्या स्ट्राईक रेटने आणि 39.72च्या सरासरीने 4965 धावा केल्या आहेत. (universe boss chris gayle predicted for ipl 2023 told which team will go to the playoffs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अशी ताकद लावायची! दिग्गज विराटकडून युवा फलंदाज तिलक अन् नेहालला खास टिप्स, फोटो जोरदार व्हायरल
पराभवानंतर बुमराहच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला रोहित; म्हणाला, ‘मागील 6-8 महिन्यांपासून त्याच्याशिवाय…’