जमैकाचा अव्वल धावपटू उसेन बोल्टने ‘फादर्स डे’च्या दिवशी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. उसेन बोल्टने रविवारी सोशल मिडीया अकाउंटवर एक फोटो शेअर केला. या फोटोच्या माध्यमातून त्याने आपण पुन्हा एकदा पिता झाल्याची माहिती दिली आहे. या फोटोमध्ये बोल्टसह त्याची पत्नी केसी बेनेट आणि जुळी मुले देखील दिसत आहेत.
बोल्टने हा फोटो शेअर केल्यावर चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र त्याच वेळी एका अजून हटके कारणामुळे हा फोटो चर्चेत आला. बोल्टने मुलांच्या ठेवलेल्या नावांमुळे या फोटोची जोरदार चर्चा रंगली होती.
‘अशी’ आहेत नावे
उसेन बोल्टने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन नवजात बाळांचा फोटो शेअर केला. या वेळी त्याने त्याच्या जुळ्या मुलांची नावे देखील सांगितले. बोल्टने आपल्या मुलांची नावे ‘सेंट लियो बोल्ट’ आणि ‘थंडर बोल्ट’ अशी ठेवली आहेत. या हटके नावांमुळे चाहत्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा होती. बोल्टने आपल्या मुलीचे नाव देखील ‘ऑलिम्पिया लाईटनिंग बोल्ट’ असे ठेवले आहे.
खास बाब म्हणजे उसेन बोल्टने ‘फादर्स डे’च्या दिवशीच ही खुशखबर शेअर केली. इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करतांना त्याने लिहिले की, ‘फादर्स डेच्या शुभेच्छा. इतकी सुंदर भेट देण्यासाठी केसी बेनेट तुझे खूप खूप आभार! या दोघांसाठी मी खूप खुश आहे.’
https://www.instagram.com/p/CQWeB5dFGB0/?utm_source=ig_web_copy_link
जगातील सर्वोत्तम धावपटूंपैकी एक आहे बोल्ट
जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट जगातील सार्वकालीन महान धावपटू आहे. १०० मीटर आणि २०० मीटर ट्रॅक रेसमध्ये त्याने नोंदवलेले विश्वविक्रम आजही अबाधित आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने तब्बल आठ सुवर्णपदक जिंकण्याची किमया केली आहे. सलग तीन ऑलिम्पिक मध्ये १०० मीटर आणि २०० मीटर अशा दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला पुरुष धावपटू ठरला होता. जवळपास एक दशकभर पुरुषांच्या ट्रॅक रेसमध्ये वर्चस्व गाजवल्यानंतर २०१७ साली बोल्टने निवृत्तीची घोषणा केली होती.
महत्वाच्या बातम्या:
कसोटी क्रिकेटमध्ये का आहे अश्विन सर्वोत्तम गोलंदाज? बुमराहने सांगितले कारण
बुमराहच्या सुमार कामगिरीमुळे पत्नी संजनावर नेटकऱ्यांनी साधला निशाणा, उमटल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
‘रहाणे स्वार्थी, आपलं अर्धशतक पूर्ण करण्याच्या नादात बाद झाला,’ दिग्गजाचे मोठे वक्तव्य