क्रिकेटविश्वात अनेक मित्रांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये पाकिस्तान संघाचा फिरकीपटू उस्मान कादिर आणि बाबर आझम यांच्याही नावाचा समावेश होतो. हे दोघेही खेळाडू पाकिस्तानच्या वरिष्ठ संघाव्यतिरिक्त ज्युनिअर स्तरावरही एकत्र खेळले आहेत. मात्र, आता या उस्मानने बाबरच्या मैत्रीविषयी मोठे विधान केले आहे. त्याच्या या विधानाने खळबळ माजली आहे. त्याच्यानुसार, बाबरच्या मैत्रीमुळे त्याला नुकसान झाले आहे. मात्र, तो असे का म्हणाला, चला जाणून घेऊयात…
काय म्हणाला उस्मान कादिर?
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याच्यावर आरोप होतात की, तो आपल्या आवडत्या खेळाडूंना जास्त महत्त्व देतो. मात्र, उस्मान कादिर (Usman Kadir) याने बाबर आझम याच्याबद्दल मोठे भाष्य केले आहे. उस्मान म्हणाला आहे की, “बाबर आझमसोबतची मैत्री माझ्यासाठी तोट्याचा सौदा आहे.” यासोबतच उस्मानने सांगितले की, त्याचे बाबरसोबतचे नाते कसे आहे. उस्मान म्हणाला की, “माझे आणि बाबरची मैत्री नवीन नाहीये. आम्ही दोघे बऱ्याच दिवसांपासून एकत्र क्रिकेट खेळत आहोत.”
‘बाबर आझमसोबतच्या मैत्रीमुळे मी संघात, पण…’
उस्माननुसार, “मी आणि बाबर आझम 15 वर्षांखालील ट्रायल्सशिवाय एकत्र खेळायचो. माझ्या टीकाकारांना वाटते की, बाबर आझमसोबतच्या मैत्रीमुळे मी संघात आहे, पण असे असते, तर मी कधीच संघातून बाहेर पडायला नव्हतं पाहिजे. मात्र, मी संघातून बाहेर जात राहिलो आहे. बाबरच्या मैत्रीमुळे मला फायदा नाही, तर नुकसानच झाले आहे. त्याचा मित्र असल्यामुळे जास्त दबाव असतो.”
उस्मान कादिरची कारकीर्द
उस्मान कादिर याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने पाकिस्तान संघाकडून आतापर्यंत 1 वनडे सामना आणि 23 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. वनडेत त्याने 1 विकेट, तर टी20त 29 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर 2022मध्ये इंग्लंडविरुद्ध कराची येथे खेळला होता. (usman qadir on friendship with pakistan cricket team skipper babar azam)
महत्त्वाच्या बातम्या-
आयर्लंडला मोठा धक्का! प्रमुख क्रिकेटरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, लगेच वाचा
कहर! चार वर्षात 2 वनडे खेळलेला अश्विन वर्ल्डकपमध्ये टीम इंडियात?