आयपीएल 2025चा मेगा लिलाव (IPL Mega Auction) आता संपला आहे. या मेगा लिलावात अनेक खेळाडूंचे नशीब चमकले. या खेळाडूंमध्ये एक असे नाव होते. ज्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. तो खेळाडू म्हणजे सर्वात युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi). वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने (RR) 1.10 कोटी रुपयांना विकत घेतले. वैभव राजस्थान संघात सामील होताच त्याच्या घरात आनंदाची लाट उसळली. मात्र, या सर्व आनंदात अचानक त्याच्या वयावरून वाद सुरू झाला. त्यावर त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी सर्वांना मोठे आव्हान दिले आहे.
वैभव सूर्यवंशीचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी इंडिया डाॅट काॅमचे सहकारी अभिजित सेन यांच्याशी खास चर्चा केली. या संभाषणात ते म्हणाले, “वैभवचे स्वप्न पुढील काही वर्षांत भारतासाठी खेळण्याचे आहे. आम्हाला विश्वास आहे की, तो ते पूर्ण करू शकेल.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “राजस्थान रॉयल्सच्या एका अधिकाऱ्याने मला कॉल केला होता. तो म्हणाला, “आम्ही वैभवची राजस्थान रॉयल्समध्ये निवड केली असून आता त्याला चांगला क्रिकेटर बनवण्याची जबाबदारी आमची आहे. सरावादरम्यान तुमच्या मुलाने आम्हाला प्रभावित केले आहे. आम्ही त्याच्यामध्ये उत्कृष्ट प्रतिभा पाहिली आहे आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करण्यास मदत करण्यास तयार आहोत.”
वैभवच्या वयाच्या वादावर बोलताना वडील संजीव सूर्यवंशी म्हणाले, “आज वैभव 13 वर्ष आणि 8 महिन्यांचा आहे, जेव्हा तो पुढच्या वेळी भारतासाठी खेळेल तेव्हा त्याला हाडांची चाचणी घ्यावी लागेल आणि त्यानंतरच खरे सत्य बाहेर येईल. माझ्या फेसबुक प्रोफाईलवर तुम्ही वैभवचे फोटो पाहू शकता. गेल्या काही वर्षांत त्याचे शरीर खूप वेगाने वाढले आहे, परंतु त्यापूर्वी तो अगदी लहान मुलासारखा दिसत होता.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “16 वर्षांखालील सामना खेळताना वैभवची हाडांची चाचणी देखील झाली होती, जिथे त्याला त्याच्या लहान वयामुळे स्टँडबायवर ठेवण्यात आले होते. बाकी, त्याच्या वयाबद्दल प्रश्न उपस्थित होत राहतील, पण जेव्हा तो भारताकडून खेळेल किंवा आयपीएल खेळेल तेव्हा सर्व काही स्पष्ट होईल. वैभव या वादाला कंटाळला नाही. तो आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करत आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
आधी कसोटी, आता वनडे क्रिकेटमधूनही होणार बाबर आझमची सुट्टी?
मोठी बातमी; भारताच्या स्टार गोलंदाजाने केली निवृत्तीची घोषणा…!!!
IPL 2025; आयपीएल 2025 मधील सर्व संघाचे संभाव्य कर्णधार!






