भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची विकेट घेणे हे प्रत्येक गोलंदाजासाठी अभिमानाची बाब असते. ही कमाल कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने केली आहे. त्याने दुबई येथे गुरुवारी (३० ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळताना धोनीला त्रिफळाचीत केले. सामन्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामध्ये वरुण धोनीकडून टिप्स घेताना दिसत आहे.
चौथ्या चेंडूवर धोनी पव्हेलियनमध्ये
झाले असे की, प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने ५ विकेट्स गमावत १७२ धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना धोनी १४ व्या षटकात फलंदाजीसाठी आला होता. पुढे १५ व्या षटकात वरुण चक्रवर्ती गोलंदाजी करत होता. त्याच्या चौथ्या चेंडूवर धोनी त्रिफळाचीत होऊन पव्हेलियनच्या दिशेने मार्गस्थ झाला. असे असले तरी सॅम करन, रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
कोलकाताने शेअर केला व्हिडिओ
चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर कोलकाताने एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओ शेअर करत कोलकाताने लिहिले, “चेपॉकच्या स्टेडिअममधून धोनीला खेळताना पाहण्यापासून ते आतापर्यंत…” शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वरुण धोनीकडून टिप्स घेताना दिसत आहे.
From admiring him from the stands at Chepauk, to now…😍@chakaravarthy29's fairytale continues!#KKR #Dream11IPL #CSKvKKR pic.twitter.com/rk37xW3OQ7
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 29, 2020
चेन्नईविरुद्ध खेळलेल्या पहिल्या सामन्यात वरुणने धोनीसोबत सेल्फी घेतली होती. यावेळी तो म्हणाला होता की, तीन वर्षांपूर्वी मी चेपॉकमध्ये प्रेक्षकांसोबत बसून धोनीला खेळताना पाहत होतो.
सलग दुसऱ्या सामन्यात धोनीला केले त्रिफळाचीत
वरुणने सलग दुसऱ्या सामन्यात धोनीला त्रिफळाचीत केले आहे. वरुणच्या मिस्ट्री गोलंदाजीसमोर धोनीचा टिकाव लागला नाही आणि तो केवळ ४ चेंडूत १ धाव करत पव्हेलियनला परतला. यापूर्वी ७ ऑक्टोबरला चेन्नईविरुद्ध खेळलेल्या सामन्यात धोनीने केवळ ११ धावाच केल्या होत्या. त्या सामन्यातही धोनीला वरुणने त्रिफळाचीत केले होते.
वरुणची झाली भारतीय संघात निवड
वरुणची आयपीएलमधील कामगिरी पाहून त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या टी२० संघात निवड झाली आहे. वरुणने नुकतेच दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शानदार गोलंदाजी केली होती. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २० धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. अशी कामगिरी करणारा तो आयपीएल २०२०मधील पहिलाच गोलंदाज ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-Video : मिस्ट्री स्पिनरच्या जाळ्यात अडकला धोनी; हंगामात दुसऱ्यांदा झाला बोल्ड
-CSK vs KKR सामन्यात ऋतुराज गायकवाडसह ‘या’ खेळाडूंनी केले खास ५ विक्रम
-भारतीय संघात पहिल्यांदाच निवड झालेल्या मिस्ट्री स्पिनरने केले आहे ‘या’ चित्रपटात काम
ट्रेंडिंग लेख-
-त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…
-भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…
-अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला