---Advertisement---

इंग्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेआधी ‘हा’ खेळाडू होऊ शकतो टीम इंडियातून बाहेर, कारण घ्या जाणून

On: सोमवार, मार्च 1, 2021 12:07 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने पुढे आहे. तसेच मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना ४ फेब्रुवारी पासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच खेळवण्यात येणार आहे. कसोटी मालिका संपल्यानंतर याच मैदानावर १२ मार्च पासून ५ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली होती.

या मालिकेसाठी निवड करण्यात आलेल्या भारतीय संघात आयपीएल २०२० हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फिरकी गोलंदाज वरूण चक्रवर्तीचा देखील समावेश आहे. परंतु, मालिका सुरू होण्यापूर्वीच हा खेळाडू संघाबाहेर जाणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.

बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसाठी नवीन फिटनेस टेस्ट अनिवार्य केली आहे. या नवीन फिटनेस टेस्ट नुसार त्यांना ८.५ मिनिटात २ किलोमीटर अंतर धावून पूर्ण करायचे असते किंवा यो-यो टेस्टमध्ये १७.१ गुण मिळवायला लागतात. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार या टेस्टमध्ये वरूण चक्रवर्तीने केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याला इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकेतून मुकावे लागू शकते. पण याबाबतचा निर्णय अजून आला नाही.

दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून झाला होता बाहेर

आयपीएल २०२० हंगामात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर वरूण चक्रवर्तीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होणाऱ्या टी -२० मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली होती. परंतु, दुखापतीमुळे त्याला या महत्त्वाच्या मालिकेतून मुकावे लागले होते. दुखापत झाल्यानंतर त्याला नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये ठेवण्यात आले होते.

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी तामिळनाडू संघात मिळाले नाही स्थान

आयपीएल २०२० हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळलेल्या वरूण चक्रवर्तीला २०२१ हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाने कायम केले आहे. त्यामुळे तो सध्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कॅम्पमध्ये सराव करत आहे. वरूण चक्रवर्ती हा टी-२० स्पेशालिस्ट आहे, असे सांगून वरूण चक्रवर्तीला सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत तामिळनाडू संघात स्थान मिळाले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

टीम इंडियाची ‘माफीया गँग’! मयंक अगरवालने शेअर केलेला ‘हा’ फोटो होतोय व्हायरल

‘असा’ घालवला लॉकडाऊनचा काळ, पिझ्झा, बर्गरवर मारला ताव, केएल राहुलने केला खुलासा

विराटच्या शतकांचा दुष्काळ संपेना ! ‘इतके’ सामने झाले नाही उंचावली बॅट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---