---Advertisement---

वेंकटेशचे ‘स्वप्नवत पदार्पण’, जेमीसनच्या भेदक चेंडूवर ८८ मीटरचा षटकार ठोकत लुटली मैफील

On: मंगळवार, सप्टेंबर 21, 2021 10:52 AM
---Advertisement---

सोमवारी (२० सप्टेंबर) आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरा सामना पार पडला. हा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला गेला. केकेआरने ९ विकेट्स राखत आरसीबीवर दमदार विजय मिळवला आहे. केकेआर संघासाठी या हंगामातील हा आठवा सामना असून यामध्ये तिसरा विजय आहे. या सामन्यात मिळवलेल्या विजयामुळे संघ गुणतालीकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. केकेआरच्या या विजयामध्ये पदार्पणवीर वेंकटेश अय्यरची भूमिका महत्वपूर्ण राहिली.

२६ वर्षीय अय्यरसाठी हा सामना त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलाच सामना होता. त्याने या सामन्यात अतिशय उत्तम फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. सामन्यादरम्यान समालोचकांनीही त्याच्या या खेळीचे तोंडभरून कौतुक केले आहे. अय्यरने संघासाठी २७ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने काही अप्रतिम शाॅट खेळले आहेत. सामन्यात त्याने दिग्गज गोलंदाज काइल जेमिसनला एक जबरदस्त षटकार मारला आहे.

केकेआरच्या डावादरम्यान अय्यर सलामीला फलंदाजीसाठी उतरला होता. यावेळी आरसीबीचा गोलंदाज काइल जेमिसन पाचव्या षटकात गोलंदाजी करत होता. त्याच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अय्यरने एक लांब षटकार मारला, ज्यानंतर गोलंदाज काइलच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला पाहायला मिळाला होता. त्याने मारलेला षटकार ८८ मीटर लांब जाऊन पडला होता.

एमबीएचे शिक्षण ते आयपीएल पदार्पण
दरम्यान, अय्यरची आयपीएलपर्यंतची वाटचाल खूप खडतर राहिली आहे. त्याला क्रिकेटच्या या टप्प्यापर्यंत पोहचण्यामध्ये त्याच्या नशिबाने महत्वाची भूमिका पार पाडली आहे. अय्यरने एमबीएचे शिक्षण घेतले आहे आणि त्याला फाइनांसमध्ये चांगली नोकरी मिळू शकत होती. मात्र, क्रिकेटविषयी असलेल्या प्रेमापोटी त्याने त्या नोकरीला नकार दिला आणि क्रिकेटमध्ये स्वत:ची कारकीर्द बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर आता कुठे त्याला आयपीएलमध्ये पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोने केले आहे असेच म्हणावे लागेल.

त्याच्या पहिल्या सामन्यांनतर सर्वांच्याच त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत आणि तो केकेआरसाठी आयपीएमध्ये महत्वाचा केळाडू ठरू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कार्तिकने गाठला धोनी, आरसीबीच्या सलामीवीराला झेलबाद करत ‘या’ विक्रमांत बनला नंबर १

वैर फक्त मैदानात! आरसीबीला चोप दिल्यानंतर अय्यरने ‘रनमशीन’ कोहलीकडून घेतले फलंदाजीचे धडे- VIDEO

चक्रवर्तीच्या चक्रीवादळात अडकला मॅक्सवेल, चेंडूने गर्रकन फिरकी घेत क्षणात उडवल्या दांड्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---