भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना बुधवारी (1 मार्च) सुरू झाला. इंदौरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना खेळला जात असून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळाळे. भारतीय सलामीवीर फलंदाज केएल राहुल याला प्लेइंग इलेव्हनमधून वगलळ्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तर दुसरीकडे अनेकजण राहुलला वगळल्यामुळे आनंद देखील व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर राहुलविषयीचे असंख्य मिम्स व्हायरल होत आहेत. या मिम्समध्ये वेंकटेश प्रसाद आणि आकाश चोप्रा यांचा देखील उल्लेख होत असल्याचे दिसते.
केएल राहुल (KL Rahul) मागच्या मोठ्या काळापासून धावा करण्यासाठी झगडताना दिसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारीत सुरू झालेल्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत राहुलची बॅट पूर्णपणे शांत दिसली. पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने अवघ्या 38 धावांचे योगदान दिले. राहुलला या दोन्ही सामन्यांमध्ये भारताला अपेक्षित सुरुवात देता आली नाही. परिणामी संघ व्यवस्थापनाने तिसऱ्या कसोटीसाठी त्याला प्लेइंग इळेव्हनमध्ये संधी दिली नाही.
मागच्या आठवड्यात निवडकर्त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ घोषित केला. या संघात केएल राहुलच्या नावापुढचे उपकर्णधारपद काढून घेतले गेले होते. राहुकडून उपकर्णधारपद काढून घेतल्यानंतर तिसऱ्या कसोटीत त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगण्याची शक्यता वर्तवली जात होती. भारताचाे मेजी दिग्गज क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद () यानीदेखील राहुला संघातून वगळण्याची मागणी केली होती. प्रसाद यांनी राहुलवर टीका केल्यानंतर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा () मात्र राहुलच्या समर्थनार्थ पुढे आला आणि प्रसाद यांना प्रत्युत्तर दिले. अशात आता राहुलला संघातून वगळल्यानंतर सोशल मीडियावर प्रसाद आणि चोप्रा यांचीही जोरदार चर्चा होत आहे.
Shubman Gill replaces KL Rahul in 3rd test….
Venkatesh Prasad & Memers : pic.twitter.com/wbdfZ009SK
— UmdarTamker (@UmdarTamker) March 1, 2023
Kl rahul 😓 pic.twitter.com/jHSmOZRklf
— narsa. (@rathor7_) March 1, 2023
Dropped KL Rahul after seeing today's pitch.#KLRahul #IndvsAus pic.twitter.com/ap8qYStPKR
— Sushant (@Sarcastic_shant) March 1, 2023
Venkatesh Prasad after knowing that KL Rahul was dropped in today's match pic.twitter.com/ULQSQX8fCs
— ಭಲೇ ಬಸವ (@Basavachethanah) March 1, 2023
https://twitter.com/theprayagtiwari/status/1630784320695836672?s=20
https://twitter.com/_Cricpedia/status/1630780188714991619?s=20
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक गमावली असली, तरी संघाला चांगली सुरुवात मिळाली. पहिल्या डावात अवघ्या 109 धावा करून भारताच संपूर्ण संघ बाद झाला. नाथन लायन तीन, तर मॅथ्यू कुह्नेमन याने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. भारतासाठी विराट कोहली 22 धावांची सर्वात मोठी खेळी करू शकला. (Venkatesh Prasad in the limelight after KL Rahul was dropped from the team, memes viral on social media)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्लेइंग इलेव्हनमधून केएल राहुल अखेर बाहेर, संघ व्यवस्थापनाला का घ्यावा लागला निर्णय?
टीम इंडियाच्या अतिआत्मविश्वासाला ऑस्ट्रेलियाकडून लगाम, 50 धावांत निम्मा संघ बाद, ‘हे’ बहाद्दर तर शून्यावर तंबूत