---Advertisement---

रोहितसह ‘या’ खेळाडूंवर लक्ष द्या, वेंकटेश प्रसादने २००६ ला बीसीसीआयला लिहिले होते पत्र

On: सोमवार, जून 15, 2020 10:03 PM
---Advertisement---

भारताचा माजी गोलंदाज वेंकटेश प्रसादने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले होते. तो 2006 ला 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाचा प्रशिक्षकही होता. त्या विश्वचषकात भारतीय संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला होता. पण त्यावेळी भारतीय संघाकडून खेळलेल्या युवा चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा आणि पियूष चावला यांच्यातील प्रतिभा प्रसादने हेरली होती.

त्यामुळे प्रसादने त्यांच्यावर लक्ष देण्यासाठी बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात त्यांचा उल्लेखही केला होता. श्रीलंकेला झालेल्या त्या विश्वचषकात रोहितने 349 धावा, पुजाराने 205 धावा केल्या होत्या आणि चावलाने 13 विकेट्स घेतल्या होत्या.

त्या विश्वचषकावेळेची आठवण फॅनकोडला सांगताना प्रसाद म्हणाला, ‘पियूष चावला, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा – या तीन खेळाडूंच्या क्षमतेबद्दल आणि प्रतिभेबद्दल मला शंका नव्हती. मला चांगले माहित होते त्यांचा प्रवास मोठा असेल. खरंतर 2006 चा 19 वर्षांखालील विश्वचषक संपल्यानंतर मी बीसीसीआयला माझा रिपोर्ट सादर केला होता. त्यात मी या खेळाडूंना लवकरच रणजी आणि विभागीय सामने खेळवण्यास सांगितले होते. मी हेच सांगितले होते.’

रोहित, चावला आणि चेतेश्वरपैकी चावलाने सर्वप्रथम वरिष्ठ भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. त्याने 2006 ला इंग्लंड विरुद्ध मोहाली कसोटीतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तर रोहितने 2007 ला आयर्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यातून पदार्पण केले होते.

चेतेश्वरला मात्र त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी 2010 पर्यंत वाट पहावी लागली. त्याने 2010 ला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बंगळुरु कसोटीतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

सध्या रोहित वरिष्ठ भारतीय संघाचा तीन्ही क्रिकेट प्रकारात महत्त्वाचा खेळाडू आहे. तर पुजारा कसोटी संघातील नियमित आणि भरवशाचा खेळाडू आहे. चावला मात्र मागील काही वर्षापासून भारतीय संघातून बाहेर आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

अंगात १०४ डिग्री ताप असताना ‘या’ माजी कर्णधाराच्या दबावामुळे मुरली कार्तिक खेळला होता थेट सामना

गांगुलीने फोन करुनही ‘त्याने’ दिला होता खेळण्यास नकार; हे होते कारण

अवघ्या ७ मिनीटात गॅरी कर्स्टन झाले होते टीम इंडियाचे कोच, पहा कसे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---