टी20 मालिकेनंतर इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात वनडे मालिकेची सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना मंगळवार रोजी (29 जून) पार पडला असून इंग्लंडने 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाला केवळ 185 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाचा दिग्गज फलंदाज जो रूट याच्या तूफानी खेळीच्या जोरावर संघाने 35 षटकांतच सामना जिंकला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. दरम्यान रूटने मोठा विक्रम केला आहे.
विवियन रिचर्ड्सची रूटने केली बरोबरी
रूटने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 6000 धावांचा टप्पा पार केला आहे. याबाबतीत त्याने वेस्टइंडीज संघाचा दिग्गज खेळाडू विवियन रिचर्ड्सची बरोबरी केली आहे. रूटने 26 व्या षटकांमधील पाचव्या चेंडूवर 2 धावा घेत आपल्या वनडेतील 6000 धावा पूर्ण केल्या आहेत. याचबरोबर तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 6000 धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. रूटच्या अगोदर हाशिम अमला, विराट कोहली आणि केन विलियम्सन यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत पहिल्या तीन क्रमांकावर स्थान मिळविले आहे.
सर्वात वेगवान धावा बनवण्याचा विक्रम हाशिम अमलाने केला
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 6000 धावा बनविण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिका संघाचा माजी फलंदाज हाशिम अमलाने केला आहे. हाशिम अमलाने 123 डावांमध्ये या विक्रमाला गवसणी घालत प्रथम क्रमांकाचा मान मिळविला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली स्थान मिळविले आहे. विराट कोहलीने सर्वात वेगवान 136 डावांमध्ये 6000 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर न्युझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन विराजमान आहे. विलियम्सने 139 मध्ये सर्वात वेगवान 6000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला होता.
रूटने आपल्या कारकीर्दीतील 34वे अर्धशतक झळकावले
हा जो रूटचा आपल्या कारकिर्दीतील 150 वा वनडे सामना होता. याचदरम्यान त्याने आपल्या कारकीर्दीतील 34 वे एकदिवसीय अर्धशतक लगावले. 26 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूंमध्ये जो रूटने आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यामध्ये त्याने नाबाद 79 धावा बनविल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशी क्रिकेटपटूंच्या वाईट वर्तनामुळे ‘या’ नामवंत पंचांचे मोठे पाऊल, सोडली पंचगिरी
इंग्लंड वि श्रीलंका: पहिल्या वनडेत श्रीलंकेची नामुष्कीजनक हार, ख्रिस वोक्सची भेदक गोलंदाजी
‘या’ कारणामुळे धोनीला मिळाला नाही निरोपाचा सामना, माजी निवडकर्त्यांनी केला खुलासा