---Advertisement---

…ज्यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये ४५ मिनिटांत अवघ्या १५ धावांवर संपला होता एका संघाचा संपूर्ण डाव

On: बुधवार, फेब्रुवारी 10, 2021 7:07 AM
---Advertisement---

क्रिकेटचा सामना जिंकण्याची जिद्द असणारे खेळाडू प्रत्येक संघात असतात. फलंदाज असो वा गोलंदाज प्रत्येक जण आपली पडती बाजू सांभाळून घेण्याचे कौशल्ये जबाबदारीने पार पाडत असतो. व्हिक्टोरिया क्रिकेट संघ हा ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया राज्याचे प्रतिनिधित्व करणारा क्रिकेट संघ आहे. या संघाने आत्तापर्यंत अनेक अविस्मरणीय सामने खेळले आहेत. मात्र, त्यातील एक सामना असा आहे, ज्याची आठवणही त्या संघाला नकोशी वाटेल. सन १९०४ ला ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर व्हिक्टोरिया संघ अवघ्या १५ धावांवर गारद झाला तेही फक्त ४५ मिनिटांत!

दिनांक ९ फेब्रुवारी १९०४ रोजी व्हिक्टोरिया संघ एमसीसी संघाविरुद्ध एक तासही क्रिकेटच्या मैदानावर टिकू शकला नाही. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर प्रथम श्रेणी क्रिकेटची ही सर्वात कमी धावसंख्या बनली गेली. ११७ वर्षांपूर्वी व्हिक्टोरिया संघाला एमसीसीच्या प्लम वॉर्नच्या संघाने अवघ्या ४५ मिनिटांत १५ धावांवर सर्वबाद करून तंबूत पाठवले.

व्हिक्टोरिया संघाने आपल्या पहिल्या डावात २९९ धावा काढल्या होत्या तर एमसीसी संघाने २४८ धावसंख्या उभारली. त्यामुळे व्हिक्टोरियाचा संघ ५१ धावांनी पुढे होता. एका सामान्य क्रिकेटसारखा हा खेळ रंगत होता. दुसऱ्या वेळी एमसीसीच्या संघाला जास्तीत जास्त बळी घेण्याची आवश्यकता होती आणि तसे झालेसुद्धा.

एमसीसीच्या विलफ्रेड ऱ्हो़ड्सने ६ धावा देत ५ तर ओरनाल्डने ८ धावा देत ४ बळी हस्तगत केल्या. तर एक खेळाडू अबसेंट हर्ट होता म्हणजे कोणत्यातरी कारणाने तो फलंदाजीला येऊ शकला नाही. त्यामुळे अवघ्या १५ धावांवर व्हिडिओरीयाचा डाव संपुष्टात येण्याची नामुष्की ओढावली. त्यामुळे ६७ धावांचे लक्ष्य एमसीसी संघाला सहज पेलता आले आणि २ बळी गमावून हा ८ खेळाडू राखून हा सामना सहज जिंकला.

सन १९१३ म्हणजेच १०६ वर्षांपूर्वी देखील लँगपोर्ट संघाचे सर्व खेळाडू एकही खाते न उघडता शून्यावर बाद झाले होते आणि हा सामना ग्लास्टॉनबरीच्या विरोधात खेळला गेला होता. क्रिकेटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झालं होते.

सन १९५५ च्या कसोटी सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंडच्या विरोधात २६ धावा करून सर्व खेळाडूंना बाद केले होते. ही कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या आहेत तर एकदिवसीय सामन्यात २००४ सालामध्ये झिम्बाब्वेचा संघ श्रीलंकेविरुद्ध अवघ्या ३५ धावांवरच गारद झाला होता. आंतरराष्ट्रीय टी-२० मधील सर्वात कमी धावसंख्या ३९ ही असून श्रीलंकेविरुद्ध नेदरलँडच्या संघाने ही धावसंख्या उभारली होती.

प्रथम श्रेणीतील सर्वात कमी धावा या ६ असून साल १८१० मध्ये द बीएस संघाने इंग्लंडच्या विरोधात या धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

अरेरे! घरच्या मैदानवरच आली वॉशिंग्टन सुंदरवर वाईट वेळ, विनोद कांबळीच्या नकोशा विक्रमाची केलीय बरोबरी

‘रिषभ पंत यष्टीरक्षणात आहे पाळण्यातील बाळ’, ‘या’ माजी क्रिकेटरने घेतला पंतचा खरपूस समाचार

“रिषभ पंतच्या भितीने घोषित केला नाही पहिला डाव”, इंग्लंडच्या संघनायकाचा मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---