क्रोएशियाचा डिफेंडर डोमॅगोज विदाला बसच्या छतावरून घसरताना गोलकिपर डॅनिजेल सुबॅसिकने वाचवले. क्रोएशियात झालेले हे दोन दशकातील सगळ्यात मोठे सेलेब्रेशन डिफेंडर डोमॅगोज विदाला चांगलेच महागात पडले असते.
रशियात झालेल्या फिफा विश्वचषकात क्रोएशिया उप-विजेता ठरला. यावर्षी क्रोएशिया पहिल्यांदाच अंतिम सामन्यात खेळला. यामुळे रौप्यपदक विजेत्या संघाचे देशात जोरदार स्वागत करण्यात आले.
क्रोएशियाची राजधानी झॅग्रेब येथे झालेल्या स्वागत सोहळ्यात सुमारे 100,000 पेक्षा अधिक नागरीकांनी हजेरी लावली.
यावेळी कोणाचेही लक्ष विदाकडे गेले नाही. मात्र सुबॅसिकने क्षणाचाही विलंब न लावता विदाच्या टी-शर्टला पकडले आणि त्याला वर ओढले. या घटनेनंतर विदाने सुबॅसिकला आलिंगन दिले.
https://twitter.com/funnygirl2313/status/1019193435310510080
विदाने या स्पर्धेतील सहा सामन्यात एक गोल नोंदवला आहे. सध्या तो बीसिकाटास जे.के. फुटबॉल क्लबकडून खेळल आहे.
मात्र लवकरच त्याने विश्वचषकात केलेल्या कामगिरीच्या जोरावर लीव्हरपूल त्याच्याशी 20 मिलीयन पौंडचा करार करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-