विजय हजारे ट्राॅफी 2018 च्या उपांत्य सामन्यात मुंबईने हैद्राबादचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या सामन्यात पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यरने अर्धशतके करत मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यात हैद्राबादने दिलेल्या 247 धावांचा पाठलाग करताना शॉने रोहित शर्मासह सलामीला फलंदाजी केली. यावेळी 8 व्या षटकात शॉने मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर 3 चेंडूत 16 धावा काढल्यानंतर रोहितने त्याला जाऊन मिठी मारली.
या षटकात पहिल्या तीन चेंडूंवर शॉला सिराजने टाकलेल्या चेंडूवर धावा घेण्यात अपयश आले होते. त्यात सिराजने टाकलेल्या बाउन्सरवर शॉला फटका मारता न आल्याने स्लेज केले होते.
पण पहिल्या तीन चेंडूंनंतर शॉने चौथ्या चेंडूवर स्टंपच्या मागील बाजूला षटकार ठोकला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर त्याने फाइन लेगला सलग दुसरा षटकार मारला. तर या षटकातील शेवटच्या चेंडूवर शॉने लेग साइडला चौकार ठोकला. त्याच्यातील ही आक्रमकता बघून खुश झालेल्या रोहितने त्याला मिठी मारली.
https://twitter.com/NaaginDance/status/1052493738973560832
या सामन्यात मुंबईकडून शाॅ आणि रोहितने 73 धावांची सलामी दिली. शाॅने 44 चेंडूत 61 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 2 षटकारांची बरसात केली. तर रोहितने 17 धावा केल्या.
हे दोघे बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने नाबाद 55 तर अजिंक्य रहाणेने नाबाद 17 धावा केल्या. मुंबईला 25 षटकांत जिंकण्यासाठी 92 धावांची गरज असताना पाऊस आल्यामुळे सामना थांबविण्यात आला. परंतु पावसाने विश्रांती न घेतल्यामुळे व्हीजेडी मेथडने मुंबईला 60 धावांनी विजयी घोषीत करण्यात आले.
तत्पुर्वी हैद्रबादकडून रोहित रायडूने 132 चेंडूत 121 धावांची नाबाद खेळी केली. तर मुंबईकडून तुषार देशपांडेने 55 धावांत 3 विकेट घेतल्या.
मुंबईचा अंतिम सामना 20 आॅक्टोबरला दिल्ली विरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडीयम, बंगळूरू येथे होईल.
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद
–झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून
-टाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू