मंगळवारी (10 जानेवारी) गुवाहाटीमध्ये खेळल्या गेलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात खेळपट्टी फलंदाजीसाटी अनुकूल होती. विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या वादळी खेळीच्या जोराबत भारतीय संघ मोठी धावसंख्या गाठू शकला. पण संघासाठी गोलंदाजी विभागात मोहम्मद सिराज देखील जबरदस्त फॉरममध्ये दिसला. सिराजने श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिस याला ज्या पद्धतीने त्रिफळाचीत केले, त्यासाठी त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओत श्रीलंकन यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिस (Kusal Mendis) स्ट्राईकवर आहे. श्रीलंकेच्या डावातील सहाव्या षटकात सिराज गोलंदाजीसाठी आला होता. षटकातील तिसरा चेंडू त्याने अचूक स्टंपांमध्ये टाकला. मेंडिसला मात्र अंदाजा न आल्यामुळे चेंडू थेट स्टंप्समध्ये घुसला. श्रीलंकनस संघाला सिराजने दिलेला हा लागोपाठ तिसरा थक्का होता. पहिली विकेट त्याने अविष्का फर्नांडो (Avishka Fernando) याची घेतली. फर्नांडो सिराजच्या चेंडूवर हार्दिक पंड्याच्या हातात झेलबाद झाला. मेंडिस त्रिफळाचीत झाल्यानंतर तो स्वतः देखील या भेदक चेंडूमुळे हैराण झाल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
A sensational⚡️delivery from @mdsirajofficial as Kusal Mendis goes for a duck.
Siraj picks up his second wicket.
Live – https://t.co/262rcUdafb #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/56KTxvp57u
— BCCI (@BCCI) January 10, 2023
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहली (Virat Kohli) याने 87 चेंडूत 113 धावांची झंजावाती खेळी केली. तर शुबमन गिल (Shubman Gill) याने 60 चेंडूत 70 धावांची खेळी केली, तर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 67 चेंडूत 83 धावा कुटल्या. या तिघांच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने 50 षटकात 7 बाद 373 धावा केल्या. रोहित आणि विराट यांचा 2023 मधील हा पहिला सामना संघासाठी त्यांना अप्रतिम खेळी केली. (VIDEO Dangerous bowling by Mohammad Siraj, clean bowled to Kusal Mendis)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेविरुद्ध भारतीयांची बॅट नेहमीच तळपते, पण ‘या’ भारतीयांनी केलेत बाप रेकॉर्ड, कोहली नंबर 1
मायदेशात विराटचेच राज! सचिनला पछाडत पोहोचलाय दुर्मिळ विक्रमात अव्वलस्थानी






