मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर गेल्या दोन दिवसांपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या रंगतदार लढतीच्या दुसऱ्या दिवसाखेर भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने नाबाद शतकी खेळी केली. त्यामुळे क्रिकेट रसिक तिसऱ्या दिवशी भारताकडून मोठ्या आगाडीची प्रतिक्षा करत होते. रहाणेही संघाला मजबूत आघाडी मिळवून देण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरला होता, परंतु दुर्दैवाने तो बाद झाला.
असे केले ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी रहाणेला धावबाद
भारताने ७ बाद २७७ धावांपासून पुढे तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु केला. एकीकडे झुंजार शतकानंतर मोठ्या खेळीची आस धरून रहाणे फलंदाजी करत होता; तर दुसरीकडे जडेजा अर्धशतक पूर्ण करण्याच्या घाईत होता. डावातील ९९ व्या षटकापर्यंत त्याच्या ४९ धावा झाल्या. परंतु त्यापुढील षटक टाकण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायनने पहिल्या ४ चेंडूत जडेजाला धाव घेऊ दिली नाही.
अखेर लायनच्या षटकातील पाचव्या चेंडूवर जडेजाने शॉर्ट कव्हरला फटका मारला आणि एक धाव घेण्यासाठी रहाणेला इशारा केला. रहाणेनेही लगेचच प्रतिसाद देत धाव घेतली. तेवढ्यात क्षेत्ररक्षण करत असलेल्या मार्नस लॅब्यूशानेने चेंडू पकडला आणि यष्टीरक्षक टीम पेनकडे फेकला. यावेळी थोडक्यात रहाणेची धाव हुकली आणि काही इंचांच्या फराकमुळे तो धावबाद झाला. कित्येक क्रिकेट रसिकांनी रहाणेचा धावबाद होतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
https://twitter.com/rreddypannala/status/1343349273870491649?s=20
A stellar knock from #TeamIndia captain @ajinkyarahane88 comes to an end following an unfortunate run-out, his first in Test cricket. He returns after scoring a valiant 112. 👏🏾
Details – https://t.co/bG5EiYj0Kv pic.twitter.com/hDa5ULj7Le
— BCCI (@BCCI) December 28, 2020
सामन्याचा थोडक्यात आढावा
रहाणे १२ चौकारांच्या मदतीने ११२ धावा करत धावबाद झाला. त्याच्यानंतर ५७ धावांवर जडेजानेही आपली विकेट गमावली. त्यामुळे भारतीय संघाचा डाव गडगडला आणि ३२६ धावांपर्यंत भारतीय संघ सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्या दुसऱ्या डावाची खास सुरुवात करता आली नाही. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने चौथ्या षटकात सलामीवीर जो बर्न्सला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले.
त्यानंतर फिरकीपटू आर अश्विनने मार्नस लॅब्यूशानेला २८ धावांवर पव्हेलियनला पाठवले. पुढे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने स्टिव्ह स्मिथची दांडी उडवत महत्त्वपूर्ण विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रकिंग! वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह, स्कॅनसाठी मैदानातून बाहेर
रनआऊट आणि यांच जरा वाकडच! धावबाद न होता सर्वाधिक कसोटी डाव खेळणारे क्रिकेटर