दुखापतीचे ग्रहण मानगुटीवर बसलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाच्या रुपात अजून एक धक्का बसला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या या सामन्यात आधीच भारत बॅकफूटवर असताना अष्टपैलू जडेजा शनिवारी (०९ जानेवारी) दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे जडेजाचा डावा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचे कळल्याने तो उरलेला सामना आणि उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. यानंतर नुकताच एक भारतीय खेळाडू जडेजाची सेवा करत असतानाचा व्हिडिओ पुढे आला आहे. हा खेळाडू अजून कोण नसून नवदीप सैनी आहे.
ऑस्ट्रेलियातील ७ क्रिकेटने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत जडेजा आणि युवा भारतीय गोलंदाज नवदीप सैनी भारतीय संघाची जर्सी घालून सामना पाहात बसलेले दिसत आहेत. यावेळी जडेजा सहयोगी कर्मचाऱ्यांपैकी एका व्यक्तीला आवाज देत केळ घेऊन यायला सांगतो. मात्र त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाला आहे आणि त्याने उजव्या हातात ग्लब्स घातलेले आहेत, हे पाहून सैनीने ओळखून घेतले की तो केळीची साल काढू शकणार नाही.
त्यामुळे सैनीने स्वत: हात पुढे करत जडेजाच्या हातातील केळ घेतले आणि त्याची साल काढून जडेजाला ते केळ खाण्यासाठी दिले. त्याच्या या सेवा करण्याच्या वृत्तीची नेटकऱ्यांनी भरभरून प्रशंसा केली आहे. ७ क्रिकेटनेही व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सांघिक कामगिरीचा छोटासा दाखला, सैनी जडेजासाठी केळीची साल काढून देत आहे.”
A bit of teamwork, Saini peeling the banana for Jadeja 😅 #AUSvIND pic.twitter.com/O0KYKZT1a9
— 7Cricket (@7Cricket) January 11, 2021
जडेजा सिडनी कसोटीत फलंदाजी करण्याच्या तयारीत!
सिडनी कसोटीतील भारताच्या पहिल्या डावात जडेजाला फलंदाजीदरम्यान डाव्या अंगठ्याला मिशेल स्टार्कने टाकलेला बाऊंसर लागला होता. पण तरीही त्याने फलंदाजी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणासाठी तो मैदानात उतरला नाही. त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले होते. जडेजाच्या ऐवजी मयंक अगरवालने दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण केले होते.
मात्र स्कॅननंतर जडेजाचा अंगठा फ्रॅक्चर असल्याचे निदान झाल्याने प्राप्त माहितीनुसार तो पुढील सहा आठवडे मैदानावर उपलब्ध राहू शकणार नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या आणि पुढील चौथ्या कसोटीसाठी देखील रविंद्र जडेजा खेळणार नाही, हे जवळपास ठरल्यात जमा आहे. मात्र, बीसीसीआयकडून त खेळणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
तरीही जडेजा सिडनीतील कसोटी सामन्यात फलंदाजी करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. कारण तो भारतीय संघाची जर्सी, ग्लब्स आणि पॅड घालून बसल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अशात खरोखरच जडेजा दुखातपतीनंतर जिद्दीने मैदानावर उतरेल का नाही?, हे पाहावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
दमदार खेळी करून तंबूत परतणाऱ्या पंतचं सर्वांनी केलं कौतुक, पण नाराज ‘गुरुजींनी’ ढुंकूनही नाही पाहिलं
राहुल द्रविड- नम्रतेचा महामेरू बहुत जनांसी आधारु