भारत आणि श्रीलंका (IND vs SL) या दोन संघांमध्ये सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. पहिल्या कसोटीत भारताने रविवारी मोहालीमध्ये विजय मिळवला आहे. ही कसोटी भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याची (Virat Kohli) १०० वी कसोटी सामना होता. मोहाली कसोटी (Mohali Test) दरम्यान त्याने दाखवून दिले आहे की तो सर्वश्रेष्ठ का आहे? या मालिकेदरम्यान स्टेडियममध्ये विराट प्रेक्षकांना संघ आणि गोलंदाजांच्या समर्थनासाठी उद्युक्त करताना दिसला. त्याचा तो व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
श्रीलंकेच्या दूसऱ्या डावाच्या ३० व्या षटकात हा प्रकार पाहायला मिळाला. भारतीय गोलंदाज जसप्रीत बूमराह गोलंदाजी करत होता. यादरम्यान विराट कोहली चाहत्यांसोबत व्यस्त असल्याचे दिसले. तो संघाचा आणि भारतीय गोलंदाजांच्या समर्थनासाठी प्रेक्षकांकडे पाहून इशारा करताना दिसला. विराट कोहली हा १०० वी कसोटी खेळून सुनील गावसकर आणि सचिन तेंडूलकर यांच्या क्लबमध्ये समाविष्ट झाला आहे. भारतासाठी १०० वी कसोटी खेळणारा तो १२ वा खेळाडू ठरला आहे.
विराट कोहलीच्या १०० व्या कसोटीच्या अगोदर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला विशेष कॅप देऊन सन्मानित केले. त्या कॅपवर विराटचे नाव आणि १०० असे लिहले आहे. या दरम्यान त्याची पत्नी अनुष्का आणि त्याचा भाऊ विकास कोहलीसुद्धा उपस्थित होते.
https://twitter.com/CRICKET04756762/status/1500390286551236609
https://twitter.com/imVKohliOne8/status/1500324569722195969
कोहलीने १०० व्या कसोटी दरम्यान बीसीसीआयचे आभार मानले आहेत आणि त्याचे बालपणीच्या नायकांपैकी एकाकडून कॅप मिळणे हे त्याच्यासाठी आश्चर्यजनक असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याची पत्नी आणि भाऊ सुद्धा तेथे उपस्थित असल्याने त्याने हा माझ्यासाठी खास क्षण असल्याचे त्याने म्हटले आहे.
मोहाली कसोटीत विराट कोहलीने ७६ चेंडूत ४५ धावा केल्या. यादरम्यान त्याने हनुमा विहारीसोबत भागिदीरी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. विराट कोहलीला श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज लसिथ एम्बुलडेनियाने बाद केले. भारताने आपला पहिला डाव ८ विकेट गमावल्यानंतर ५७४ धावांवर डाव घोषित केला. रविंद्र जडेजाने या कसोटीत १७५ धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. तसेच त्याने गोलंदाजीत देखील उत्तम कामगिरी करत ९ विकेट घेतल्या.
भारतीय संघाने मोहाली कसोटीत दमदार कामगिरी करताना १ डाव आणि २२२ धावांनी जिंकली. भारतीय संघाने पहिल्या डावात ५७४ धावा केल्या आणि श्रीलंका संघाने दोन्ही डावात १७४ आणि १७८ धावा केल्या. श्रीलंकेच्या दूसऱ्या डावात जडेजाने ४ आणि अश्विनने ४ विकेट घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने २ विकेट घेतल्या. या सामन्यादरम्यान आर अश्विनने ४३५ विकेट पूर्ण करत कपिल देवचा विक्रम मोडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
कर्नाटकचा ‘हा’ युवा फलंदाज ठोठावतोय टीम इंडियाचं दार, गेल्या २ वर्षांपासून आहे तुफान फॉर्ममध्ये
आर्यन पम्प्स एमएसएलटीए १५०००डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत सहजा यमलापल्ली हिला विजेतेपद






