---Advertisement---

वृद्धिमान साहा कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर ‘अशी’ होती हैदराबादमधील संघ सहकाऱ्यांची प्रतिक्रिया

On: रविवार, मे 16, 2021 11:21 PM
---Advertisement---

जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा १४ वा हंगाम (आयपीएल) कोविड-१९ च्या भारतातील दुसऱ्या लाटेमुळे स्थगित केला गेला आहे. एकापाठोपाठ एक अनेक खेळाडू कोरोना संक्रमित आढळल्याने २९ सामन्यानंतर हा हंगाम तात्पुरता रद्द केला गेला. ४ मे रोजी स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली गेल्याची घोषणा करण्यात आली. सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याचा कोरोना अहवाल संक्रमीत आल्यानंतर संघातील वातावरण कशा प्रकारचे होते याबाबत अष्टपैलू विजय शंकर याने खुलासा केला आहे.

हे खेळाडू झाले कोरोना बाधित
आयपीएलचा निम्मा हंगाम संपल्यानंतर ३ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सचे संदीप वॉरियर व वरूण चक्रवर्ती हे खेळाडू कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. सोबतच चेन्नई सुपर किंग्स संघातील एक कर्मचारीदेखील या आजाराच्या विळख्यात सापडला होता. ४ मे रोजी अमित मिश्रा (दिल्ली कॅपिटल्स) व वृद्धिमान साहा (सनरायझर्स हैदराबाद) हे कोरोना संक्रमित आढळल्याने स्पर्धा अचानकपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विजय शंकरने केला खुलासा
सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू विजय शंकर याने वृद्धिमान साहा याचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर संघामध्ये कशा पद्धतीचे वातावरण होते, याचा खुलासा केला. तो म्हणाला, “भीतीपेक्षा सर्वांना चिंता अधिक वाटत होती. इतर संघातील खेळाडू पॉझिटिव्ह आहेत हे समजल्यानंतर तितकेसे काही वाटले नाही. परंतु, साहा पॉझिटिव्ह आल्याने परिस्थिती काहीशी गंभीर झाली. आयपीएल जेव्हा स्थगित झाली त्यादिवशी आम्हाला एक सामना खेळायचा होता. आम्ही सामन्याची तयारी करत होतो. स्पर्धा स्थगित केल्याचे आम्हाला माहीत नव्हते.”

पुन्हा आयपीएल सुरु करण्याचे प्रयत्न
उर्वरित स्पर्धा पुन्हा आयोजित करण्यात येईल का याविषयी बीसीसीआय चाचपणी करताना दिसतेय. सध्या श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती व इंग्लंड असे तीन पर्याय बीसीसीआय पुढे आहेत. स्पर्धा पूर्ण न झाल्यास बीसीसीआयला तब्बल २५०० कोटींचा तोटा होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या –

आहा! आपल्या होणाऱ्या पत्नीसह मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू गोव्यात लुटतोय सुट्ट्यांचा आनंद; रोमँटिक फोटो केला शेअर

“त्याला पाचव्या क्रमांकावर खेळवा किंवा मंगळावर, काहीही फरक पडत नाही”, दिग्गजाने एबीवर उधळली स्तुतीसुमने

कोहलीचे समर्थन करणार्‍या सलमान बट्टचा टोला मायकेल वॉनला लागला वर्मी, मग चिडून दिला ‘हा’ रिप्लाय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---