विंसी प्रीमियर टी१० लीग २०२०मधील ८वा सामना रविवारी (२४ मे) खेळण्यात आला. हा सामना ग्रेनेडाइंस डाइवर्स आणि फोर्ट शार्लोट स्टायकर्स संघात खेळण्यात आला. डायवर्स संघाने स्ट्रायकर्सला २२ धावांनी पराभूत करत सामना जिंकला.
हा सामना जिंकत डायवर्सने (Grenadlines Divers) लीगमधील पहिला विजय आपल्या नावावर केला. तर स्ट्रायकर्सला (Fort Charlotte Strikers) लीगमध्ये सलग तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला.
डायवर्सने दिलेल्या ११५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्ट्रायकर्स संघाला ६ बाद ९२ धावाच करता आल्या. यावेळी स्ट्रायकर्सकडून फलंदाजी करताना गिड्रॉन पोपने ३० चेंडूत ५९ धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये ८ षटकारांचा समावेश आहे. तर जाहिल वाल्टर्सने १३ धावा केल्या. इतर खेळाडूंना मात्र २ आकडी धावसंख्याही पार करता आली नाही.
यादरम्यान डायवर्सकडून गोलंदाजी करताना रेझिन ब्राउनने (Razine Browne) सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर तिजोर्न पोप (Tijorn Pope), ओबेड मॅककोय (Obed McCoy) आणि ब्रॅक्सी ब्राउनने (Braxie Browne) प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी डायवर्सने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद ११४ धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार आसिफ हॉपरने (Asif Hopper) ३५ चेंडूत नाबाद सर्वाधिक ५९ धावा केल्या. त्यात ३ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश आहे. तसेच अॅलेक्स सॅम्युअलने (Alex Samuel) २७ धावांची खेळी केली.
स्ट्रायकर्सकडून गोलंदाजी करताना रे जॉर्डन (Ray Jordan), रशीद फ्रेडरिक (Rasheed Frederick) आणि चेल्सन स्टोव (Chelson Stowe) यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
या लीगमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक (Fastest Fifty) करणारा डायवर्स संघाचा हॉपर पहिला फलंदाज बनला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-विंसी प्रीमियर लीगमध्ये ‘या’ संघाने केवळ ३ सामने खेळत पटकाविला अव्वल क्रमांक…
-हा परदेशातील खेळाडू तासंतास पहातो धोनीच्या फलंदाजीचे व्हीडिओ
-इंग्लंडच्या माजी कर्णधाराने सांगितला शाहरुख खानबरोबर सामना पहाण्याचा अनुभव