Happy Birthday Vinod Kambli: भारतीय क्रिकेट संघातील सर्वात तेजस्वी स्टारपैकी एक मानला जाणारा विनोद कांबळी आज त्याचा 53वा वाढदिवस साजरा करत आहे. एकेकाळी अपवादात्मक प्रतिभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांबळीचे आयुष्य अलिकडेच ग्लॅमरपासून दूर गेले आहे. 18 जानेवारी 1972 रोजी मुंबईत जन्मलेल्या कांबळीला अलिकडेच मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ने प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्घाटन समारंभात सन्मानित करण्यात आले. या बातमीद्वारे विनोद कांबळीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर एक नजर टाकूयात.
कांबळीने जानेवारी 1993 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्याच्या स्फोटक कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या खेळाडूने त्याच्या पहिल्या चार कसोटी सामन्यांमध्ये दोन द्विशतके केली होती. एवढेच नाही तर त्याने पुढील दोन कसोटी सामन्यांमध्ये दोन शतकेही झळकावली. मात्र, तो त्याच्या कारकिर्दीची सुरुवात ज्या पद्धतीने केली होती त्याच पद्धतीने प्रगती करू शकला नाही.
कांबळीने टीम इंडियासाठी फक्त 17 कसोटी सामने खेळले आणि यामध्ये त्याने 54.20 च्या सरासरीने 1084 धावा केल्या. या दरम्यान त्याने चार शतके आणि तीन अर्धशतके झळकावली. तो 1000 कसोटी धावा पूर्ण करणारा सर्वात जलद भारतीय आहे. त्याने इतक्या धावा करण्यासाठी फक्त 14 डाव खेळले. हा असा विक्रम आहे जो सचिनसह कोणत्याही भारतीय फलंदाजाला आजपर्यंत मोडता आलेला नाही. यशस्वी जयस्वाल त्याचा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता पण त्यालाही 1000 धावा करण्यासाठी 16 डाव लागले.
विनोद कांबळीची थोडक्यात आंतराष्ट्रीय करिअर
121 आंतरराष्ट्रीय सामने
3561 आंतरराष्ट्रीय धावा
17 अर्धशतके
6 शतके
1995 चा आशिया कप विजेता
वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी एक द्विशतक आणि दोन शतके झळकावणारा कांबळी हा थोडासा रागीट स्वभावाचा होता आणि त्याचे दारूशीही नाते होते. त्याच्या स्वभावामुळे आणि छंदामुळे त्याची क्रिकेट कारकीर्द जास्त काळ टिकू शकली नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 104 सामन्यांमध्ये 32.59 च्या सरासरीने 2477 धावा केल्या. यामध्ये दोन शतके आणि 14 अर्धशतकांचा समावेश होता. त्याने भारताकडून शेवटचा एकदिवसीय सामना 2000 मध्ये खेळला होता.
हेही वाचा-
टीम इंडियात जागा मिळेना, या भारतीय क्रिकेटपटूनं सुरू केली स्वत:ची स्पोर्ट्स अकादमी
महिला टी20 वर्ल्डकपला आजपासून सुरुवात; जाणून घ्या कधी, कुठे पाहायचा थेट सामना
मनु भाकर-डी गुकेशसह इतर चौघांना खेलरत्न अवाॅर्ड, तर स्वप्नील कुसळेसह या 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान