भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ९७ तर दुसऱ्या डावात नाबाद धावांची खेळी केली आहे.
विराटने या मालिकेत तसेच सध्या सुरु असलेल्या सामन्यात अनेक विक्रम केले आहेत. परंतु आज जेव्हा विराटने ७६वी धाव घेतली तेव्हा ही त्याची यावर्षीची कसोटीतील ७००वी धाव होती.
त्याने यावर्षी कसोटीत ६ सामन्यात १२ डावात फलंदाजी करताना ६४च्या सरासरीने ७०४ धावा केल्या आहेत. तर वनडेत ९ सामन्यात १२४च्या सरासरीने ७४९ धावा केल्या आहेत.
यावर्षी वनडे आणि कसोटीत ७०० पेक्षा अधिक धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
कसोटीमध्ये यावर्षी विराट सोडून एकाही खेळाडूला हा ७०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा अजुनतरी करता आल्या नाहीत.
वनडेत जाॅनी बेअरस्ट्रो (९७०), जो रुट (८००) आणि जेसन राॅय (७८०) या इंग्लंडच्या फलंदाजांनी ७००पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स कबड्डीत भारतीय पुरुष कबड्डी संघाचा निराशाजनक पराभव
–एशियन गेम्स: लक्ष्यने मिळवून दिले भारताला दुसरे रौप्यपदक
–एशियन गेम्स: नेमबाज दिपक कुमारला रौप्यपदक