भारतीय संघाने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात १५१ धावांनी विजय मिळवला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाचा हा तिसरा सर्वात मोठा विजय होता. या विजयासह भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. हा सामना झाल्यानंतर विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनून आहे.
या सामन्यातील शेवटच्या दिवशी(१६ ऑगस्ट) भारतीय संघ बॅकफूटवर होता. इंग्लंड संघातील गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी करायला सुरुवात केली होती. त्यावेळी असे वाटू लागले होते की, भारतीय संघ हा सामना गमावणार. परंतु, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारतीय संघाला २९८ धावा करण्यात यश आले होते. या दोघांनी मिळून ८९ धावांची भागीदारी केली होती. यासह भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर २७२ धावांचे आव्हान दिले होते.
इंग्लंड संघ जेव्हा २७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आला होता. त्यावेळी ६० षटकांचा खेळ शिल्लक होता. त्यावेळी जेव्हा भारतीय संघातील खेळाडू मैदानात उतरले होते. यावेळी कर्णधार विराट कोहली भारतीय खेळाडूंना म्हणाला होता की, “ही ६० षटकं इंग्लंड संघाला नरक असल्यासारखी वाटायला हवीत.”
कोहलीचे हे भाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे शब्द ऐकल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकू दिले नव्हते. (Virat Kohli 60 seconds speech video went viral on social media,watch video)
https://twitter.com/pant_fc/status/1427274913996365834
For 60 overs England should feel like hell out there.
Epitome of Insane Mental Strength (Virat Kohli).#IndvsEng https://t.co/mSUHVJnJKV
— Nitin Harjait (@nitin_harjait) August 17, 2021
दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांचा बोलबाला
भारतीय संघाने दिलेल्या २७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या सलामीवीरांना फार काळ टिकता आले नाही. दोघेही भोपळाही न फोडता माघारी परतले होते. त्यानंतर पहिल्या डावात शतक झळकावणारा कर्णधार जो रूट याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु तो देखील या डावात मोठी खेळी करू शकला नाही. तो ३३ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
शेवटी जोस बटलरने एकहाती झुंज दिली. परंतु ही झुंज देखील अपयशी ठरली. तो २५ धावा करत तंबूत परतला होता. इंग्लंडचा संपूर्ण डाव १२० धावांवर संपुष्टात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड संघात अकरा नव्हे, तर दोनच खेळाडू खेळत होते, माजी भारतीय कर्णधाराची यजमानांवर बोचरी टीका
मोठ्या मनाचा विराट! विजयाच्या जल्लोषातही दाखवली खिलाडूवृत्ती
टीम इंडियातील ‘त्या’ दोघांना कमी लेखून मोठी चूक केली, जो रूटची कबुली






