दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू मार्को यान्सने याने सेंच्युरियन कसोटीत नाबाद 84 धावांची खेळी केली होती. पण केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात यान्सने शुन्यावर बाद झाला. कसोटी कारकिर्दीतील तिसरा ‘फाईव्ह विकेट हॉल’ घेणाऱ्या मोहम्मद सिराज याने त्याची विकेट घेतली. पण या विकेटसाठी भारतीय दिग्गज विराट कोहली याचेही योगदान राहिले.
भारतीय संघ (Team India) मागच्या काही दिवसांपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. उभय संघांतील टी-20 आणि वनडे मालिका संपल्यानंतर सध्या कसोटी मालिका खेळली जात आहे. पहिल्या कसोटीत मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी बुधवारी (3 जानेवारी) भारतीय संघ केपटाऊनमध्ये मैदानात उतरला. मालिकेतील हा दुसरा आणि शेवटचा सामना असून पहिल्या डावात दक्षिण आफ्रिका संघ अवघ्या 55 धावांवर गुंडाळला गेला. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेसाठी अर्धशतक करणाऱ्यांमध्ये मार्कोय यान्सने (Marco Jansen) याचे नाव होते. पण केपटाऊनमध्ये यान्सनने तीन चेंडू खेळून मोहम्मद सिराजच्या चेंडूवर शुन्य धावा करून विकेट गमावली.
मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने या सामन्यात सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. यासाठी वेगवान गोलंदाजाने 9 षटके गोलंदाजी करून 15 धावाही खर्च केल्या. सिरजाने टाकलेल्या लेग कटर चेंडूवर यान्सनने यष्टीरक्षक केएल राहुल याच्या हातात झेल दिला आणि विकेट गमावली. पण या विकेटचे श्रेय सिराजइतकेच विराट कोहली (Virat Kohli) यालाही जाते. कारण हा चेंडू टाकण्यासाठी विराटनेच सिराचला सुचना केल्या होत्या. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
— Tilak Verma (@GOATKLISBACK) January 3, 2024
(Virat Kohli advises Mohammad Siraj to bowl a leg-cutter to dismiss Marco Jansen)
केपटाऊन कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर (कर्णधार), एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, लुंगी एलगिडी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा