बेंगलोर। रविवारी (21 एप्रिल) एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल 2019 मधील रोमांचकारी सामना पहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात बेंगलोरने 1 धावेने विजय मिळवला.
बेंगलोरच्या या विजयात अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने मोलाचा वाटा उचलला. बेंगलोरने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असलेल्या चेन्नईला स्टेनने पहिल्याच षटकात दोन जोरदार धक्के दिले.
त्याने पहिल्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर अनुक्रमे शेन वॉटसन आणि सुरेश रैनाला बाद केले. या विकेट्स घेतल्यानंतर त्याने बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीसह जोरदार जल्लोष केला.
त्यांच्या या जल्लोषाचा आणि याच सारखा 2010 मध्ये जल्लोष करतानाचा स्टेन आणि विराटचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे या सामन्यानंतर विराट आणि स्टेनने या फोटोवर आणि त्यांच्या आठवणींबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत.
स्टेन आयपीएलमध्ये याआधीही 2008 ते 2010 असे तीन मोसम बेंगलोरकडून खेळला आहे. या तीन मोसमात त्याने बेंगलोरकडून खेळताना 28 सामन्यात 27 विकेट्स घेतल्या होत्या. आता पुन्हा 9 वर्षांनंतर बेंगलोर संघात परतला आहे.
त्यामुळे या आठवणींबद्दल आणि त्या फोटोबद्दल बोलताना विराट म्हणाला, ‘नुकताच सोशल मीडियावर ’10 वर्षांचे आव्हान’ असा एक फोटो आला आहे. मला वाटते सर्वांनी तो पहावा. त्यात डाव्या बाजूला 2010 मधील मी आणि स्टेन आहे, तर उजव्या बाजूला 2019 मधील मी आणि स्टेन आहे.’
‘दोन्ही बाजूंना स्टेन सारखा दिसत आहे. पण त्याच्याबरोबर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला असणारा एक वेगळाच व्यक्ती आहे.(विराट गमतीने स्वत:च्या फोटोबद्दल असे म्हणाला.) 10 वर्षांनंतरही स्टेनबरोबर सेलिब्रेशन करायला मस्त वाटते. 2010 मध्ये आमचे मार्ग बदलल्यानंतर आम्ही विचार केला नव्हता की आम्ही पुन्हा एकदा चिन्नास्वामी स्टेडियमवर असेच सेलिब्रेशन करु.’
तसेच स्टेन म्हणाला, ‘त्या फोटोमुळे अनेक जून्या चांगल्या आठवणी जाग्या झाल्या. या फोटोत दिसते की तू(विराट) किती चांगली कामगिरी केली आहे. विराटने त्याच्या कामगिरीने जगात त्याची छाप सोडली आहे. तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.’
‘मी भाग्यशाली आहे की मी त्याला सुरुवातीपासून पाहिले आहे. तो 18 वर्षांचा असताना मी त्याला भेटलो होतो आणि तोच आता भारतीय संघाचा कर्णधार म्हणून माझ्या समोर उभा आहे. त्यामुळे हा एक सन्मान आहे.’
स्टेनला बेंगलोर संघात दुखापतग्रस्त नॅथन कुल्टर नाईल ऐवजी संधी मिळाली आहे. स्टेनने आयपीएलमध्ये दोन वर्षांनी पुनरागमन केले आहे. तो यामोसमाआधी आयपीएलमध्ये शेवटचे 2016 च्या मोसमात गुजरात लायन्सकडून खेळला होता.
https://twitter.com/IPL/status/1120189236169150464
https://twitter.com/Maha_Sports/status/1120306462763311104
महत्त्वाच्या बातम्या –
–धोनीला असे करताना पाहुन पार्थिव पटेलही झाला आश्चर्यचकित…