आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे कर्णधार विराट कोहलीवर जोरदार टीका केली जात आहे. यादरम्यान आणखी एक मुद्दा चर्चेत येऊ लागला आहे. तो म्हणजे विराट कोहली आणि आर अश्विन यांच्यातील नातेसंबंध. गेल्या काही महिन्यांपासून आर अश्विन आणि विराट कोहली यांच्यातील नातेसंबंध चर्चेत राहिले आहे. तसेच आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात अनुभवी गोलंदाज आर अश्विनला प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्थान न दिल्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे.
आयपीएल २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाने इंग्लंडचा दौरा केला. या दौऱ्यावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामने खेळले गेले होते. या चारही सामन्यात आर अश्विनला संघात स्थान दिले गेले नव्हते. तसेच यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी देखील आर अश्विनची निवड करण्यात आली आहे. परंतु विराट कोहली त्याला पुन्हा एकदा दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. अशातच इंग्लंडचा माजी फलंदाज निक कॉम्प्टन याने आर अश्विन आणि विराट कोहलीच्या नाते संबंधाबाबत एक ट्विट केले आहे, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रविवारी (३१ ऑक्टोबर) न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला ८ गडी राखून पराभूत केल्यानंतर निक कॉम्प्टनने एक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, “मला हेच कळत नाहीये की, विराट कोहलीसोबत मैत्रीपूर्ण संबंध नसल्यामुळे आर अश्विनला संघाबाहेर का राहावे लागत आहे? कर्णधारांना हे हक्क मिळावे, असे तुम्हाला वाटते का? ”
I just don’t understand how Kohli’s prickly relationship with Ashwin is allowed to keep him out of Indian teams? Do you think Captains should be allowed such autonomy?
— Nick Compton (@thecompdog) October 31, 2021
काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये अशी चर्चा रंगली होती की, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर ज्या खेळाडूने बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे विराट कोहलीच्या संघातील खेळाडूंसोबतच्या वागणुकीबद्दल तक्रार केली तो आर अश्विन होता. परंतु त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचीही नावे समोर आली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ ३ अनफिट खेळाडूंवर विश्वास दाखवून निवडकर्त्यांनी केली चूक? टी२० विश्वचषकात ठरतायत फेल
ब्रेकिंग! पुन्हा मैदानावर दिसणार षटकारांची आतषबाजी; माजी अष्टपैलू युवराजने केली पुनरागमनाची घोषणा
टी२० विश्वचषक सामन्यानंतर टी२० क्रमवारीतही पाकिस्तानचा भारताला ‘दे धक्का’, ठरला वरचढ