भारतीय संघ टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. संघाने सोमवारी (10 ऑक्टोबर) वेस्टर्न ऑस्ट्रेलियासोबत सराव सामना खेळला. माजी कर्णधार विराट कोहली या सामन्यात खेळला नाही, पण त्याने सराव सत्र मात्र चुकवले नाही. आगामी विश्वचषक स्पर्धेत विराटची भूमिका भारतीय संघासाठी सर्वात महत्वाची आहे, ही गोष्ट तो स्वतः देखील चांगलीच जाणतो. दरम्यान, त्याचा सराव सत्रातील व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात मुख्य प्रशिक्षर राहुल द्रविड देखील त्याला मार्गदर्शन करताना दिसत आहेत.
वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) खेळला नसला, तरी भारताने हा सामना जिंकला. सामन्यात खेळला नसला, तरी विराटने सराव सत्रात चांगलाच घाम गाळला. त्याने सराव सत्रात फलंदाजीचा कसून सराव केला. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यावेळी त्याला चेंडू टाकताना दिसत होते. व्हिडिओत दिसते की, मुख्य प्रशिक्षक द्रविड विराटला कव्हर ड्राईव्ह खेळण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. द्रविडने विराटसोबत पुरेसा वेळ घावल्याचेही सांगितले जात आहे. द्रविड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. त्यांनी स्वतःच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 48 शतक ठोकले आहेत. आता त्यांचा हा अनुभव विराटच्याही नक्कीच कामी येऊ शकतो.
विराट कोहली मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्मशी झगडत होता. त्याने मागच्या महिन्यात आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेल्या एका सामन्यात नाबाद 122 धावांची धमाकेदार खेळी केली होती. मागच्या जवळपास तीन वर्षांमध्ये विराटने केलेले हे पहिलेच शतक होते. चाहते या क्षणाची मोठ्या काळापासून वाट पाहत होते आणि विराटने आशिया चषकात चाहत्यांची प्रतिक्षा संपवली होती. त्यानंतर विराटने मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आप्रिका यांच्यासोबत देखील चमकदार खेळी करून दाखवली.
Virat Kohli in the nets. pic.twitter.com/yOqQUhfBev
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 10, 2022
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात विराटने 63 धावाची वादळी खेळी केली होती. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटीमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने 28 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या होत्या. चाहत्यांना विराटकडून आगामी टी-20 विश्वचषकात देखील अशाच प्रदर्शनाची अपेक्षा आहे. टी-20 विश्वचषक 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून भारताला पहिला सामना 23 ऑक्टोबरला खेळायचा आहे. अभियानाची सुरुवात करताना भारतासमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघ असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvSA: मालिका निर्णायक सामन्यात नाण्याचा कौल भारताच्या बाजूने, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन
‘ही’ गोष्ट विजय किंवा पराभवाने ठरत नाही, रविचंद्रन अश्विनचे पीसीबी अध्यक्षांना सडेतोड प्रत्युत्तर