भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या चर्चेत आहेत. या दोघांना दोन दिवसांपूर्वीच कन्यारत्न प्राप्ती झाली. मात्र आता एका अजब घटनेने हे दोघं चर्चेत आले आहेत. एका प्रसिद्ध वृत्तपत्राने या दोघांचा फोटो दहशतवाद्यांच्या बातमीत छापल्याने खळबळ उडाली आहे.
‘द हितवाद’ या प्रसिद्ध वृत्तपत्राने ही चूक केली आहे. ‘जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये अटक’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीत या वृत्तपत्राने चक्क कोहली आणि अनुष्काचा फोटो छापला आहे. नजरचुकीने हे घडले असल्याचे स्पष्ट असले तरी नेटीझन्स मात्र यावर चांगलेच भडकल्याचे दिसून आले.
Okay 🙄 pic.twitter.com/dw7EZxJxj1
— Arun Bothra 🇮🇳 (@arunbothra) January 12, 2021
https://twitter.com/Jvlmk/status/1348933226664927232?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1348933226664927232%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fm.dailyhunt.in%2Fnews%2Findia%2Fenglish%2Flatestly-epaper-lateng%2Fviratkohlianushkasharmaspicappearsinnewspaperarticleaboutjemterroristsphotoofthisallegedmisprintgoesviral-newsid-n244923512%3Fs%3Dauu%3D0x810ca0fed59d2bb3ss%3Dwsp
Neeche wala photo upar attach ho gaya https://t.co/bZWNddbEtO pic.twitter.com/mYtb4lzMQl
— Zuheeb (@iam_freakk) January 12, 2021
अनेकांनी ट्विटरवरुन याबाबत नाराजी व्यक्त केली. एका प्रसिद्ध आणि राष्ट्रीय वृत्तपत्राकडून झालेली ही चूक गंभीर असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. वृत्तपत्राने दिलगिरी व्यक्त केली तरी झालेली हानी भरून निघणार नसल्याचेही काही जणांनी म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
दीपक हुड्डा-कृणाल पंड्या प्रकरणावर इरफान पठाणने मांडले मत, म्हणाला
आध्या सकाळी 3 वाजता रडतेय असं समज! अश्विनच्या पत्नीचा गमतीशीर सल्ला