---Advertisement---

टी20 विश्वचषकातील सर्वात भारी व्हिडिओ, अर्धशतकवीर सूर्याला सेलिब्रेशन करण्यास विराटने पाडले भाग

Virat-Kohli-And-Suryakumar-Yadav
---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये 8वा टी20 विश्वचषकाचा महाकुंभमेळा सुरू आहे. या मोठ्या टी20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील 11वा सामना भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात पार पडला. टी20 विश्वचषकातील हा भारताचा दुसराच सामना होता. या सामन्यात तीन भारतीय फलंदाजांनी शानदार फटकेबाजी करत अर्धशतक साकारले. यादरम्यान भारतीय विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने अर्धशतक साकारताच विराट कोहली याने त्याला जल्लोष करण्यास भाग पाडले. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात थोडीशी खराब झाली. भारताची पहिली विकेट 2.4 षटकात 11 धावांवर पडली. ही विकेट सलामीवीर केएल राहुल याची होती. तो 9 धावांवर तंबूत परतला. यानंतर रोहितने संघाचा डाव सांभाळत अर्धशतक साकारले. त्याने विराट कोहली (Virat Kohli) याच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. यावेळी रोहितने 53 धावांचे योगदान दिले. तो 11.6 षटकात बाद झाला.

पुढे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) फलंदाजीला आला. त्याने जोरदार फटकेबाजीला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूने विराटही आपली बॅट चालवत होताच. विराटने 37 चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. यामध्ये 1 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. सामन्याअखेरीस विराटने 44 चेंडूत नाबाद 62 धावा चोपल्या. यामध्ये 2 षटकार आणि 3 चौकारही सामील होते. पुढे सूर्यकुमारही चौकारांचा पाऊस पाडत धावसंख्येत भर घालत होता. व्हॅन बीक याच्या शेवटच्या षटकातील 5 चेंडू संपल्यानंतर सूर्यकुमार 45 धावांवर खेळत होता. त्याला अर्धशतक साकारण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता होती. शेवटच्या चेंडूवर त्याने जोरदार षटकार मारला आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने यावेळी त्याने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी फक्त 25 चेंडू घेतले. यामध्ये 1 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता.

अर्धशतक पूर्ण करूनही सूर्यकुमारने सेलिब्रेशन केले नसल्याचे पाहून विराटने स्वत: बॅट वर करण्याची कृती करत सूर्यकुमारला अर्धशतक साजरे करण्यास भाग पाडले. त्यांचा यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/Mahendr09076283/status/1585555867646447616

https://twitter.com/sahilkumSahi/status/1585554048581005313

https://twitter.com/BhavjotBrar12/status/1585556417825890306

https://twitter.com/viratdangar/status/1585556018078965762

भारतीय संघाने या सामन्यात निर्धारित 20 षटकात 2 विकेट्स गमावत 179 धावा चोपल्या. तसेच, नेदरलँड्स संघाला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले. नेदरलँड्सने सुरुवातीचे दोन सामने जिंकल्यानंतर त्यांना पुढील दोन सामन्यात श्रीलंका आणि बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशात ते हा सामना जिंकतात की, हरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता भारतीय महिलाही होणार मालामाल, पुरुष खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावत कमावणार लाखो रुपये

VIDEO: सरकारही पडलं अन् ‘तोही’ झाला शांत, बांगलादेशच्या सलामीवीरांनी गपगुमान धरली तंबूची वाट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---