भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात रविवारी (०६ फेब्रुवारी) अहमदाबादच्या मैदानावर पहिला वनडे सामना (First ODI) पार पडला. भारतीय संघाचा हा वनडे क्रिकेटमधील १००० वा (1000th ODI) सामना होता. भारतीय संघाने ६ विकेट्सने हा सामना जिंकला. मात्र या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) फ्लॉप ठरला. ४ चेंडूंचा सामना करताना २ चौकारांच्या मदतीने ८ धावा करून तो झेलबाद (Virat Kohli Out On 8 Runs) झाला. या एकेरी धावसंख्येसह त्याने सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याचा मोठा विक्रम मोडला आहे.
विराटने मोडला सचिनचा विक्रम
या ८ धावांच्या छोटेखानी खेळीसह विराटने मायदेशात वनडेतील आपल्या ५००० धावा पूर्ण केल्या (5000 ODI Runs At Home) आहेत. विशेष म्हणजे, त्याने सर्वात जलद ही कामगिरी केली आहे. केवळ ९६ वनडे डावांमध्ये त्याने घरच्या मैदानांवरील ५००० वनडे धावांचा आकडा गाठला आहे. यापूर्वी भारताकडून हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याच्या नावावर होता. त्याने १२० वनडे डावांमध्ये ही कामगिरी केली होती. परंतु आता विराट सचिनच्याही पुढे निघून गेला आहे.
मायदेशात वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारे जगभरातील टॉप-४ फलंदाज
९६ डाव – विराट कोहली
१२१ डाव – सचिन तेंडुलकर
१३० डाव – जॅक कॅलिस
१३८ डाव – रिकी पाँटिंग
याबरोबरच विराट घरच्या मैदानावर ५००० वनडे धावा करणारा जगातील केवळ चौथा फलंदाज बनला आहे. त्याच्यापूर्वी सचिन, रिकी पाँटिंग आणि जॅक कॅलिस यांनी हे पराक्रम केले होते. मायदेशात सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात सचिन ६९७६ धावांसह अव्वलस्थानी आहे. तर ५५२१ धावांसह ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंग हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिकी दिग्गज जॅक कॅलिस हा ५१८६ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दिग्गजांनंतर विराट चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने भारतातील मैदानांवर ५००२ धावा केल्या आहेत. त्यामुळे तो लवकरच जॅक कॅलिसला मागे सोडेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘संघ व्यवस्थापनाला युवा अष्टपैलूंवर विश्वास नाही’; दिग्गजाचा सनसनाटी आरोप