भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आणि ‘रनमशीन’ म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली हा मागील २ वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करतो आहे. २०१९ पासून त्याच्या बॅटमधून एकही आंतरराष्ट्रीय शतक आलेले नाही. त्यामुळे चाहते कोहलीच्या मोठ्या खेळीची आतुरतेने वाटत पाहात आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात कोहली विश्रांतीवर होता. त्यानंतर मुंबईत चालू असलेल्या दुसऱ्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु पुन्हा एकदा चाहत्यांचा हिरमोड झाला. या सामन्यात तो खातेही न खोलता बाद झाल्याने चाहत्यांसह स्वत: कोहलीचीही फार निराशा झाली. तो मैदानाबाहेर जात असताना संताप व्यक्त करताना दिसून आला आहे.
तर झाले असे की, दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी निवडलेल्या भारतीय संघाला ८० धावांवर पहिला धक्का बसला. न्यूझीलंडचा फिरकीरटू अजाज पटेलने शुबमन गिलला ४४ धावांवर झेलबाद करत भारताची सलामी जोडी तोडली. त्यानंतर अजाननेच चेतेश्वर पुजाराच्या रुपात भारतीय संघाला दुसरा मोठा धक्का दिला. पुजारा केवळ ० शून्यावर त्रिफळाचीत झाला. ८० धावांवर २ मोठे फलंदाज बाद झाल्यानंतर संघाला कोहलीकडून कर्णधार खेळीची आस होती. परंतु तोही वेळ मैदानावर टिकू शकला नाही.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कोहलीला २९.६ षटकात अजाननेच पायचित केले. यावर कोहलीने लगेचच रिव्ह्यू घेतला. यावेळी चेंडू त्याच्या पायाला आधी लागला की बॅटला, हे समजत नव्हते. तरीही तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषित केले. त्यामुळे विराटला शून्यावर माघारी परतावे लागले. अशाप्रकारे आपली विकेट गमावल्यामुळे कोहली फार संतापला. मैदानाबाहेर जाताना सीमारेषेच्या पट्टीवर जोराने बॅट आदळत त्याने आपला राग व्यक्त केला. इतकेच नव्हे तर, ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतरही तो पंचांच्या या निर्णयावर नाखुश असल्याचा दिसला.
Clearly see there was deviation. Ball hit bat first. Virat Kohli immediately take review. Third umpire doing such mistake. Nothing is going good for Virat Kohli. #IndvsNZtest #ViratKohli pic.twitter.com/P3Ugpa3rY3
— Mohali to Melbourne 82* (@MelbourneNT82) December 3, 2021
कोहलीच्या या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. परंतु त्याने राग व्यक्त केल्यानंतरही यावेळी चाहते त्याच्यावर टिका करत नसून उलट त्यांनी पंचांवरच निशाणा साधला आहे. अनेकांनी पंचांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND V NZ 2nd Test Live: मयंक अगरवालचे अर्धशतक पूर्ण; टी ब्रेकपर्यंत भारताच्या ३ बाद १११ धावा
सीएसके संघ आयपीएल मेगा लिलावात सर्वात आधी खरेदी करणार ‘हा’ खेळाडू?
ओम्रिकॉनची दहशत, भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी यजमानांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय