आशिया चषक २०२२ हंगामातील दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी देशांमध्ये खेळला गेला. या संघांनी स्पर्धेतील त्यांच्या अभियानाची सुरुवात एकमेकांविरुद्ध खेळताना रविवारी (28 ऑगस्ट) केली. भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली साठी हा सामना खास ठरला. विराट या सामन्यासाठी मैदानत पाऊल टाकताच १०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण केले.
भारताचा तिसऱ्या क्रमांकावरील विश्वासाचा फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याची बॅट मागील काही काळापासून शांत आहे. इंग्लंड दौऱ्यातही तो विशेष कामगिरी करू शकला नाही. यामुळे त्याच्यावर सतत टिका होत आहे. अशातच एशिया चषकामध्ये पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरताच क्रिकेटविश्वात ती खास कामगिरी करणारा दुसराच तर पहिला भारतीय खेळाडू ठरला.
१००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळणारा विराट कोहली पहिला भारतीय
विराटने भारताकडून यापूर्वी ९९ टी२० सामने खेळले होते. पाकिस्तानचा हा सामना त्याच्या कारकिर्दीतील १०० टी-20 सामना ठरला. भारतासाठी १०० टी२० सामने खेळणारा विराट दुसरा पुरूष खेळाडू ठरला आहे. कर्णधार रोहित शर्मा याने ही कामगिरी खूप आधी केली आहे. तसेच महिला क्रिकेटमध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. तिच्या नावावर १२९ टी-२० सामन्यांची नोंद आहे. आता १०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्यांच्या यादीत विराट नव्याने सहभागी झाला आहे.
First #TeamIndia player to play ???? matches across formats ????
Go well, @imVkohli ????????#AsiaCup2022 | #INDvPAK pic.twitter.com/QkJbaDwEFS
— BCCI (@BCCI) August 28, 2022
‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय ठरला विराट
तसेच विराट क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये १०० पेक्षा अधिक सामने खेळणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने याआधी भारताकडून १०२ कसोटी आणि २६२ वनडे सामने खेळले आहेत. विरानटे २००८ साली भारतासाठी पदार्पण केले असून २०१०मध्ये पहिला टी२० आणि २०११मध्ये पहिला कसोटी सामना खेळला. विराटपूर्वी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात १०० पेक्षा अधिक सामने खेळण्याची कामगिरी न्यूझीलंडच्या रॉस टेलर (Ross Taylor ) याने काली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
IND vs PAK | रिषभ पंत महत्वाच्या सामन्याला मुकला! कर्णधार रोहितने दिले स्पष्टीकरण
Breaking: भारताच्या पेपरात ‘आऊट ऑफ सिलॅबस क्वेश्चन!’ पाकिस्तानचा ‘हा’ गोलंदाज करतोय पदार्पण
‘पिक्चर अभी बाकी है!’ पहिला सामना जिंकल्यानंतर अफगाणिस्तानच्या कर्णधाराचे खास संकेत






