विराट कोहली याला क्रिकेटविश्वातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंमध्ये गणले जाते. तो मागील ३ वर्षांपासून खराब फॉर्ममधून जात असून त्याला एकही शतक करता आलेले नाही. असे असले तरीही, विराटच्या फॅन फॉलोइंगमध्ये कसलाही फरक पडलेला नाही. त्याची चाहत्यांमधील क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. तो भारतातील सर्वात जास्त इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेला क्रिकेटपटू आहे आणि आता त्याने याबाबतीत द्विशतक पूर्ण केले आहे.
विराटचे (Virat Kohli) इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आपले २०० मिलियन चाहते (200 Million Instagram Followers) पूर्ण झाले आहेत. तो हा टप्पा गाठणारा अर्थात इंस्टाग्रामवर २०० मिलियन फॉलोअर्स असलेला जगातील पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू बनला आहे.
इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या यादीत विराटच्या पुढे प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो, कायले जेनर, लिओनल मेस्सी, ड्वेन जॉनसन (द रॉक), एरियाना ग्रँडे, सेलेना गोम्स, किम कार्डाशियन, बेयॉन्स, जस्टिन बीबर आणि केंडल जेनर आहेत. यामध्ये रोनाल्डो हा सर्वाधिक ४५० मिलियन फॉलोअर्स असलेला व्यक्ती आहे.
https://www.instagram.com/p/CegrpQrgMIl/?utm_source=ig_web_copy_link
एका इंस्टाग्राम पोस्टमधून किती कमावतो विराट?
असे म्हटले जाते की, विराट इंस्टाग्राम पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या बाबतीत १९व्या स्थानावर आहे. तसेच तो इंस्टाग्राम पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणारा भारतीय खेळाडूही आहे. विराट एका पेड इंस्टाग्राम पोस्टसाठी जवळपास ६८०००० डॉलर चार्ज करतो. त्याची नेट वर्थ जवळपास १२७ मिलियन डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार ९५० कोटी इतकी आहे.
विराटनंतर सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेले भारतीय क्रिकटर्स
विराटनंतर माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी याचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. तो इंस्टाग्रामवर जास्त सक्रिय नसला तरीही त्याचे ३८.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यानंतर सचिन तेंडूलकरचा तिसरा क्रमांक लागतो, ज्याचे इंस्टाग्रामवर ३४.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर विद्यमान भारतीय कर्णधार रोहित शर्मा (२४ मिलियन), अष्टपैलू हार्दिक पंड्या (२१.५ मिलियन) यांचाही पहिल्या ५ क्रिकेटपटूंमध्ये क्रमांक लागतो.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बाबो ! रुटची बॅटपण राहते “स्वत:च्या पायावर उभी,” पाहा व्हिडिओ
हे भारीये! जेव्हा नदालने जिंकलेले पहिले फ्रेंच ओपन, तेव्हा आजचा उपविजेता होता केवळ ‘इतक्या’ वर्षांचा
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: आयपीएलमध्ये ‘कल्ला’ करणाऱ्या ‘या’ तीन खेळाडूंवर राहिल नजर