दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना (Sa vs Ind 3rd test) केपटाऊनच्या मैदानावर सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने जोरदार पुनरागमन करत विजय मिळवला होता. ही मालिका १- १ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना अतिशय महत्वाचा आहे. या महत्वाच्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली याने (Virat Kohli half century) संयमी अर्धशतकी खेळी केली. यासह दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे.
भारतीय संघाचा कर्णधार गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक २ वर्षांपूर्वी झळकावले होते. त्यामुळे चाहते त्याच्या शतकी खेळीची आतुरतेने वाट पाहत आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. असे वाटू लागले होते की, विराटची शतकी खेळीची प्रतीक्षा अखेर संपणार, परंतु तो अवघ्या ७९ धावांवर बाद होऊन माघारी परतला.
या अर्धशतकी खेळीसह तो दक्षिण आफ्रिकेत पाहुण्या संघाचा कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करणारा तिसरा कर्णधार ठरला आहे (Most 50 plus scores by visiting captain in South Africa). विराट कोहलीने ७ वेळेस असा कारनामा केला आहे. तर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky ponting) या यादीत पहिल्या स्थानी आहे. रिकी पाँटिंगने १६ वेळेस असा कारनामा केला होता. ब्रायन लाराने (Brian Lara) ८ वेळेस असा कारनामा केला होता.
हे नक्की पाहा :
दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावा करणारे पाहुण्या संघाचे कर्णधार
१६ वेळेस – रिकी पाँटिंग
८ वेळेस – ब्रायन लारा
७ वेळेस – विराट कोहली*
६ वेळेस – सौरव गांगुली
६ वेळेस – स्टीफन फ्लेमिंग
६ वेळेस – अर्जुन रणतुंगा
महत्वाच्या बातम्या :
सुंदर कोरोनाबाधित झाल्याने ‘या’ अष्टपैलूचे खुलले भाग्य; सहा वर्षांनंतर वनडे संघात वर्णी
सचिन तेंडूलकरची बीसीसीआयमध्ये होणार एन्ट्री? वाचा काय म्हणाले जय शाह
पाकिस्तान दौऱ्यावर एकटे नाही जाणार ऑस्ट्रेलियन खेळाडू, जाणून घ्या कोण असेल सोबत