मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात बिनबाद 8 धावा केल्या आहेत. तसेच भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला आहे.
या सामन्यात भारताकडून कर्णधार विराट कोहलीने 204 चेंडूत 82 धावा केल्या. याबरोबरच विराटने यावर्षी परदेशात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा करण्याचा टप्पा पार केला आहे. परदेशात एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारा विराट पहिला आणि एकमेव फलंदाज आहे.
त्याने या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परदेशात खेळताना 30 सामन्यातील 39 डावात 61.70 च्या सरासरीने 2098 धावा केल्या आहेत.
यातील 1138 धावा या त्याने 11 कसोटी सामन्यात, तर 749 धावा 9 वनडे सामन्यात केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने टी20 मध्ये 10 सामन्यात 211 धावा केल्या आहेत. विराटने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परदेशात एकूण 7 शतके आणि 9 अर्धशतके केली आहे.
परदेशात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
2098 – विराट कोहली (2018)
1712 – हाशिम आमला (2012)
1609 – कुमार संगकारा (2006)
1455 – तिलत्करने दिल्शान (2009)
1451 – विराट कोहली (2014)
महत्त्वाच्या बातम्या:
–याला म्हणतात नशीब! रोहित शर्माबद्दल घडलेला हा किस्सा पहाच
–ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा मुर्खपणा, म्हणे कोहलीने क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी
–त्या गोलंदाजाच नाव जरी घेतलं तरी कोहली, पुजारा आणि रहाणे येतात टेन्शनमध्ये