आयपीएल २०२२मधील ६०वा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज संघात हा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या नुकसानावर २०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात बेंगलोरकडून सलामीला फलंदाजीला येत स्टार फलंदाज विराट कोहली याने इतिहास रचला. त्याने पहिली धाव काढताच आयपीएलमधील मोठ्या आणि अद्वितीय अशा विक्रमाला गवसणी घातली आहे.
पंजाबविरुद्ध १ धाव काढत विराटने आपल्या आयपीएलमधील ६५०० धावा पूर्ण केल्या आहेत. २२० सामने २१२ डाव खेळताना त्याने या धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ५ शतके आणि ४३ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल इतिहासात इतक्या धावांचा आकडा गाठणारा विराट पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. त्याच्यापूर्वी कोणत्याही फलंदाजाला ही अद्भुत कामगिरी करता आलेली नाही.
विराटनंतर धवन आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या खात्यात ६१८६ धावा आहेत. धवन आणि विराट यांच्याव्यतिरिक्त आजवर आयपीएलमध्ये कोणालाही ६००० धावांचा आकडा पार करता आलेला नाही. धवननंतर डेविड वॉर्नर (५८७६ धावा), रोहित शर्मा (५८२९ धावा) आणि सुरेश रैना (५५२८ धावा) पहिल्या ५ क्रमांकावर आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
६५०० धावा – विराट कोहली*
६१८६ धावा – शिखर धवन
५८७६ धावा – डेविड वॉर्नर
५८२९ धावा – रोहित शर्मा
🚨 Milestone Alert 🚨
6⃣5⃣0⃣0⃣ IPL runs (& going strong) for @imVkohli! 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/jJzEACTIT1 #TATAIPL | #RCBvPBKS | @RCBTweets pic.twitter.com/ChlRNpWy33
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2022
मात्र विराटच्या या हंगामातील कामगिरीवर नजर टाकायची झाल्यास, त्याचे प्रदर्शन अतिशय निराशाजनक राहिले आहे. तो या हंगामात १२ सामने खेळताना फक्त २१६ धावा करू शकला आहे. दुर्दैव म्हणजे, त्याने फक्त १९.६४ च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. ही त्याची गेल्या ७ वर्षांतील सर्वात वाईट कामगिरी आहे. मागील सलग ७ हंगामात त्याने ३०० पेक्षा जास्त धावा काढल्या होत्या.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (प्लेइंग इलेव्हन)- विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन)- जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, भानुका राजपक्षे, मयंक अग्रवाल (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिविंगस्टोन, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग
महत्त्वाच्या बातम्या-
बेअरस्टोने दाखवली आयपीएलमधील आपली ‘पॉवर’, पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा चोपण्यात बनला ‘टॉपर’
‘त्याच्याकडे गती आहे, पण परिपक्व बनायला अजून वेळ लागेल’, उमरान मलिकची शमीने केली पाठराखण