विराट कोहली याच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर अहमदाबाद कसोटीत भारताने मोठी धावसंख्या उभी केली. उभय संघांतील हा कसोटी सामना सोमवारी (13 फेब्रुवारी) अनिर्णित राहिला. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 नावावर केली. विराट कोहली त्याच्या 186 धावांच्या जोरावर सामनावीर ठरला. कसोटी कारकिर्दीतील विराटने मिळवलेले हे 10वा सामनावीर पुरस्कार ठरला. याचसोबत त्याने आपल्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद देखील केली.
अशी कामगिरी करणारा विराट एकमेव
विराट कोहली (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमेव खेळाडू बनला आहे, ज्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये 10 सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत. वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये विराट आधीच 10पेक्षा अधिक वेळा सामनावीर ठरला होता. पण कसोटी फॉरमॅटमध्ये सोमवारी (13 मार्च) त्याने ही कामगिरी केली. सोमवारी त्याला सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर विराटने कसोटी फॉरमॅटमध्ये 10, वनडे फॉरमॅटमध्ये 38, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट व्यतिरिक्त एकही धुरंधर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 10 पेक्षा अधिक वेळा सामनावीर बनला नाहीये.
विराट कोहलीने जिंकलेले सामनावीर पुरस्कार
कसोटी – 10
वनडे – 38
टी-20 आंतरराष्ट्रीय – 15
दरम्यान, उभय संघांतील या अहमदाबाद कसोटीचा एकंदरित विचार केला, तर विराट कोहलीच्या धमाकेदार प्रदर्शनाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 91 धावांची आघाडी घेतली. सामन्याच्या चौथा दिवस संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने नाबाद 3 धावा केल्या आणि शेवटच्या दिवशी त्यांना अजून 88 धावांची आवश्यकता होती. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या दिवशी भारताची 88 धावांची आघाडी मोडीत काढलीच, पण भारतावर पुन्हा आघाडी घेतली देखील. शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 2 बाद 175 धावा केल्या. अखेर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एकमताने खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला आणि सामना अनिर्णित राहिला. तत्पूर्वी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने, तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता.
(Virat Kohli becomes the first player to win 10 Player of the match awards in all formats)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसह खास पुरस्कारांवर भारतीयांचेच नाव; विराट सामनावीर, तर ‘हे’ दोघे बनले मालिकावीर
पुन्हा भारतात कसोटी खेळायला येणार का? स्मिथने उत्तरातच दिले भविष्याचे संकेत