क्राईस्टचर्च। आज(2 मार्च) भारताला न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या सामन्यात न्यूझीलंड संघ विजयाच्या समीप असताना भारताचा कर्णधार विराट कोहली गोलंदाजी करताना दिसून आला.
या सामन्यात भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला दुसऱ्या डावात 7 धावांची गरज असताना विराटने गोलंदाजी केली. विराटने न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात 35 व्या षटकात गोलंदाजी केली.
या षटकात विराट गोलंदाजी करत असताना हेन्री निकोल्स फलंदाजी करत होता. तर रॉस टेलर नॉन-स्ट्रायकर एन्डला होता. निकोल्सने विराटच्या पहिल्या तीन चेंडूवर एकही धाव काढली नाही. पण त्यानंतर विराटने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर बॅकवर्ड पाँइंट क्षेत्रात चेंडू फटकावत निकोल्सने चौकार मारला. पण त्यानंतर विराटने टाकलेल्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर निकोल्सला धावा काढता आल्या नाही.
विराट या षटकात गोलंदाजी करत असताना मस्तीच्या मुडमध्ये दिसून आला. तसेच जसप्रीत बुमराहही त्याच्याशी काहीतरी हसून बोलताना दिसला. तर यष्टीरक्षक रिषभ पंत ‘विकेट विकेट’, असे ओरडताना दिसला.
Virat Kohli Bowling Vs NZ😎#Kohli #ViratKohli #NZvsIND #INDvsNZTestCricket #INDvsNZ #indvsnz #Cricket pic.twitter.com/otPnIvJz1q
— Commonman (@santuwins) March 2, 2020
विराटच्या या षटकानंतर 36 व्या षटकात न्यूझीलंडने 132 धावांचे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण करत सामना जिंकला. या सामन्यात विजय मिळवण्याबरोबरच न्यूझीलंडने 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0ने जिंकत भारताला व्हाईटवॉश दिला.
विराटने आत्तापर्यंत 11 कसोटी डावात गोलंदाजी केली आहे. त्याने या 11 डावांमध्ये 175 चेंडू टाकताना 84 धावा दिल्या आहेत. मात्र त्याला एकही विकेट घेतला आलेली नाही.
भारताच्या कसोटी इतिहासात असा बाद होणारा बुमराह पहिलाच क्रिकेटर
वाचा👉https://t.co/JqX0SA517f👈#म #मराठी #cricket #TeamIndia #NZvIND @Jaspritbumrah93— Maha Sports (@Maha_Sports) March 2, 2020
तब्बल ५६ वर्षांनंतर टीम इंडियाविरुद्ध प्रतिस्पर्धी ओपनर्सने केला 'असा' मोठा कारनामा
वाचा👉https://t.co/LMGnDpZhhT👈#म #मराठी #cricket #TeamIndia #NZvIND #NZvsIND— Maha Sports (@Maha_Sports) March 2, 2020