कोरोना व्हायरसमुळे सध्या भारताबरोबरच इतर देशातही लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशामध्ये अनेक भारतीय खेळाडू कोरोना बाधितांच्या मतदीसाठी पुढे आले आहेत. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही सरकारच्या सहाय्यता निधीमध्ये ३ कोटी रुपयांचे योगदान दिले होते. आता पुन्हा एकदा विराटने मदत करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
विराटचा ब्रँड वन८ने कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) लागलेल्या लॉकडाऊनदरम्यान ३० हजार लोकांना जेवण पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे. विराटने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो अपलोड केला. ज्यामध्ये कर्मचारी बाधित लोकांसाठी जेवणाचे पॅकेट्स तयार करत आहेत.
याव्यतिरिक्त विराटने आपली बॅट आणि आयपीएलची जर्सी, क्रिकेट ग्लोव्हज आणि पॅड्सचा देखील लिलाव (Auction of Cricket Accessories) केला आहे. त्याच्याबरोबरच एबी डिविलियर्सनेदेखील त्याच्या क्रिकेटच्या वस्तूंचा लिलाव केला आहे. या लिलावानंतर जो निधी जमा होईल त्यातील अर्धी- अर्धी रक्कम विराट (Virat Kohli) आणि डिविलियर्स (AB De Villiers) दक्षिण आफ्रिका आणि भारताच्या मदतीसाठी देणार आहेत.
विराट या व्हायरसदरम्यान वारंवार आपल्या चाहत्यांशी सामाजिक अंतर ठेवण्याचे आणि लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन करत आहे.
विराटपूर्वी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलनेही (KL Rahul) आपल्या क्रिकेटच्या वस्तूंचा लिलाव केला आहे. तसेच यामध्ये पाकिस्तान आणि इंग्लंडच्या खेळाडूंचादेखील समावेश आहे.
ट्रेडिंग घडामोडी-
-आयपीएल इतिहासात प्रत्येक हंगामात सर्वात महागडा ठरलेला भारतीय खेळाडू
-पाकिस्तानच्या खेळाडूला टीम इंडियाचं कोच बनून करायचं आहे हे काम






